शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक प्रचार गीतामध्ये जय भवानी, जय शिवाजी हा उल्लेख आहे. मात्र निवडणूक आयोगाने 'भवानी' शब्दावर आक्षेप घेत तो हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी ही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असून आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या कारवाई करण्याआधी पीएम मोदी आणि अमित शाहांवर कारवाई करावी, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
(नक्की वाचा- 'जय भवानी' वरून निवडणूक आयोग अडले, ठाकरे थेट नडले, वाद पेटणार?)
राज्याचे महसूमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरेंवर या मुद्द्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. उद्धव ठाकरे बेताल वक्तव्य करत असून त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली, असल्याची टीका त्यांनी केली. तर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय योग्य असून कायद्याचे राज्य असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
सुयज विखे उद्या अर्ज दाखल करणार
लोकसभेसाठी उद्या नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजित पवार उपस्थिती राहणारि असल्याची माहिती देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
(नक्की वाचा - आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?)
परभणीच्या पाथरी येथे महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियाने मारहाण केली आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखेंनी महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणं गरजेचं असल्याचे म्हटले आहे. आचारसंहितेचा फायदा घेऊन वाळू माफियांनी पुन्हा उच्छाद मांडायला सुरुवात केलीये. मात्र मागील महसूलमंत्र्यांनी वाळू माफियांना जो राजाश्रय दिला त्यामुळेच राज्याला ही कीड लागली, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.