जाहिरात
This Article is From Mar 08, 2024

राहुल गांधी वायनाडमधून, तिरुवनंतपुरममधून थरुर, काँग्रेसची पहिली यादी आली

राहुल गांधी वायनाडमधून, तिरुवनंतपुरममधून थरुर, काँग्रेसची पहिली यादी आली
दिल्ली:

अखेर काँग्रेसनं (Congress Loksabha first list) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पुन्हा एकदा केरळच्या वायनाडमधून लोकसभेच्या मैदानात असतील तर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे राजनांदगावमधून नशीब अजमावतील. विशेष म्हणजे आजच्या काँग्रेसच्या लिस्टमध्ये महाराष्ट्रातला एकही नेता नाही. आघाडीच्या नावांची चर्चा किंवा जागा वाटपांच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. त्या पूर्ण झाल्याशिवाय महाराष्ट्रातली नावं जाहीर होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे प्रियंका गांधी लढणार का याचाही सस्पेन्स आहे. आजच्या यादीत केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मेघालय, नागालँड, लक्षद्विप, त्रिपूरा, सिक्कीममधल्या लोकसभा उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपाच्या महाराष्ट्राच्या लिस्टकडेही लक्ष

गेल्याच आठवड्यात भाजपानं 195 जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. त्यात उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह दिल्लीचे उमेदवार घोषीत करण्यात आलेले आहेत. पण महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याची उमेदवारही जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणजेच काँग्रेस आणि भाजपा दोघांच्याही पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या उमेदवारांची नावे नाहीत. त्यामुळे काँग्रेस तसच भाजपा यांच्या दुसऱ्या यादीकडे महाराष्ट्राचं आता खास लक्ष असेल. 

काँग्रेसच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय?

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि राज्यसभा खासदार अजय माकन यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स करत 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात वायनाडमधून राहुल गांधी, तर केरळच्याच तिरुवनंतरपुरममधून शशी थरुर मैदानात असतील. काँग्रेसच्या पहिल्या यादीत जनरल कॅटेगरीचे 15 , एससी, एसटी, ओबीसी कॅटेगरीचे 24 उमेदवारांचा समावेश आहे. तसच 12 उमेदवार असे आहेत ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे.  50 ते 60 वयोगटातले 8 उमेदवार आहेत. 12 उमेदवार असे आहेत ज्याचं वय 61 ते 70 दरम्यान आहे. तर 7 उमेदवारांचं वय आहे 71 ते 76 दरम्यान आहे.

राहुल गांधी अमेठीतून लढणार का?

राहुल गांधीं वायनाडमधून लढण्याची घोषणा करण्यात आली आहे पण अमेठीतून लढणार का याबाबत सस्पेन्स कायम आहे. सध्या स्मृती इराणी ह्या अमेठीच्या खासदार आहेत. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यात. त्यामुळे रायबरेलीतून प्रियंका गांधी लढणार का याबाबतही सस्पेन्स  आहे. विशेष म्हणजे आजच्या यादीत काँग्रेसच्या यूपीच्या एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. जिथं इंडिया आघाडीतल्या पक्षांसोबत चर्चा सुरु आहे, तिथले उमेदवार घोषीत केलेले नाहीत. त्यामुळेच दुसऱ्या यादीत राहुल गांधी, प्रियंका गांधी अमेठी, रायबरेलीतून लढण्याची घोषणा होईल का याची राजकीय वर्तूळात उत्सुकता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com