लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न चांगलाच गाजला होता. आता विधानसभा निवडणुकीतही सांगली पटर्नची चर्चा होवू लागली आहे. सांगली विधानसभा मतदार संघातून जयश्री पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनी बंडखोरी करू नये म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. तो काँग्रेससाठी एक धक्का होता. आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. खासदार विशाल पाटील यांनीही त्यांचा पाठिंबा जयश्री पाटील यांना जाहीर केला आहे. जयश्री पाटील या माझ्याच उमेदवार आहेत अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस उमेदवाराचे मात्र टेन्शन वाढले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील तर भाजपचे उमेदवार सुधीर गाडगे रिंगणात आहेत. तर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील या ही निवडणूक लढत आहेत. जयश्री पाटील यांनी आपल्या प्रचाराचा नारळ आज मंगळवारी फोडला. यावेळी काँग्रेसच्या कार्यालया समोरच त्यांनी भव्य सभा घेतली. यावेळी या सभेला खासदार विशाल पाटील आणि त्यांचे भाऊ माजी मंत्री प्रतीक पाटील हेही उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?
विशाल पाटील हे जरी अपक्ष असले तरी ते काँग्रेस बरोबर आहेत. ते काँग्रेसचेच काम करत आहेत. अशा वेळी विशाल पाटील यांनी सांगलीत मात्र काँग्रेस उमेदवारा विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, मी सर्वांची क्षमा मागतो. जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही. विश्वजित कदम आणि मी कमी पडलो. याची कबूली या निमित्ताने त्यांनी दिली.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले
तसेच आमच्या वसंतदादा कुटुंबाला एकदा ही काँग्रेस पक्ष कडून उमेदवारी मिळाली नाही. काय नेमकी चूक या वसंतदादा घराण्याने केली आहे. काँग्रेस पक्षाबाबत हे अजून आम्हाला कळालं नाही. निष्ठा आम्ही सोडली नाही. तरीही सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला. हा का न्याय होत गेला हे कळू शकले नाही. असेही विशाल पाटील यावेळी म्हणाले. शिवाय त्यांनी सांगलीत आपण बंडखोर जयश्री पाटील यांचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - मविआचं सरकार का पाडलं? ठाकरेंनी खरं कारण सांगितलं
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जयश्री पाटील या माझ्या उमेदवारी वेळी सर्वात पुढे होत्या. मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये अशी शंका निर्माण झाली. ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा ह्याच विकास आघाडीचा घटक आहे. असे ते म्हणाले. आपण अपक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी काँग्रेसला बोलून दाखवले.
काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यास सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे. आणि हा माझा उमेदवार आहे हे मी जाहीर करतो. येणाऱ्या निवडणुकीत जयश्री पाटील यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदाच महिला आमदार निवडून येणार आहे. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिला आहे. तसेच माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या असे विशाल पाटील यांनी यावेळी आवाहन केलं. विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारा विरोधात भूमीका घेतल्याने काँग्रेस पुढील अडचणी वाढणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world