जाहिरात
Story ProgressBack

सांगलीच्या लोकसभा आखाड्यात 3 मातब्बरांची कुस्ती, कोण ठरणार विजेता?

Sangli Lok Sabha Election 2024 : स्वातंत्र्यापासून तब्बल 60 वर्ष सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यंदा इथं काँग्रेसचा उमेदवारच नाही.

Read Time: 3 min
सांगलीच्या लोकसभा आखाड्यात 3 मातब्बरांची  कुस्ती, कोण ठरणार विजेता?
सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे.
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli Lok Sabha Election 2024 : स्वातंत्र्यापासून तब्बल 60 वर्ष सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1977 मधील काँग्रेसविरोधी लाटेतही काँग्रेसचा हा गड शाबूत होता. तब्बल 12 वेळा सांगलीमधून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील 1980 साली सांगलीचे खासदार झाले. त्यानंतर साडेतीन दशक वसंतदादांच्या घराण्यातील व्यक्ती सांगलीचा खासदार होता. 2014 साली मोदी लाटेच पहिल्यांदा सांगलीतून भाजपा उमेदवार विजयी झाला. 

( नक्की वाचा : 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संजयकाका पाटील यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला. 2019 च्या निवडणुकीमध्ये सांगलीची जागा काँग्रेस महाविकास आघाडीत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेली. वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली,मात्र या ठिकाणी वंचितकडून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या मैदानात उतरले,भाजपाचे संजयकाका पाटील,स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर,अशी तिरंगी लढत होऊन वंचितच्या फॅक्टरमुळे विशाल पाटलांचा संजयकाका पाटील यांनी दीड लाख मतांनी पराभव केला.

धनगर आरक्षणाच्या भाजप विरोधात असणारा रोष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे आकर्षण यामुळे गोपीचंद पडळकर यांना तीन लाख मत या निवडणुकीत पडली होती.विशाल पाटलांना 3 लाख 44 हजार 643 आणि संजयकाकांना 5 लाख 8 हजार 995 इतकी मते मिळाली होती.

( नक्की वाचा : तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार? )
 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून संजयकाका पाटील पुन्हा एकदा रिंगणात आहेत. महाविकास आघाडीमध्ये ही जागा आपल्याला मिळावी म्हणून काँग्रेसचा आग्रह होता. काँग्रेसनं शेवटपर्यंत प्रयत्न करुनही त्यांना ही जागा ताब्यात घेण्यात अपयश आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

पक्षीय बलाबल

सांगली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यात जत, तासगाव, खानापूर, पलूस, सांगली आणि मिरज समावेश आहे. त्यापैकी पलूस आणि जत विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत.तर तासगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. खानापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार आहे. तर सांगली आणि मिरजमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे दोन आमदार काँग्रेस आणि भाजपचे आहेत. तर एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना शिंदे गटाचे आहेत

प्रचाराचे मुख्य मुद्दे

सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्द्यांबरोबर स्थानिक प्रश्नही महत्त्वाचे ठरणार आहेत. जतच्या पाण्याचा प्रश्न, 65 गावांच्या विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना, ड्रायपोर्ट, एअरपोर्ट,रस्ते, मोठ्या उद्योगांचा जिल्ह्यात अभाव यासह काँग्रेस पक्षावर झालेला अन्याय हे मुद्दे इथं महत्त्वाचे ठरणार आहेत. 

( नक्की वाचा : 'सांगलीच्या वाघा'वरुन मविआमध्ये डरकाळ्या, राऊत-कदमांमध्ये काय घडलं? )
 

प्रचारात गाजलेलं भाषण

सांगली लोकसभा निवडणुकीत वाघ कोण? हा मुद्दा गाजला. उद्धव ठाकरे राज्याचे वाघ असतील तर आपण सांगलीचे वाघ आहोत असा दावा काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला होता. त्यावर  विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही, हे चार जूनलाच कळेल, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. त्यावरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या या निवडणुकीत चांगलाच गाजला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination