महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर अजूनही चर्चा सुरू आहे. मात्र त्यात ही काही जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यावरून आता नवा वाद समोर आला आहे. सांगोली विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र ही जागा शेकापची असल्याचा दावा होत आहे. शिवाय आघाडीकडून शेकापचाच उमेदवार असेल असंही सांगितलं जात आहे. तर ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराने आपणच अधिकृत उमेदवार असून मविआचे घटक पक्ष आपल्यालाच पाठिंबा देतील असे सांगितले आहे. त्यामुळे या मतदार संघात एकाच वेळी दोन जणांनी आपणच आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगोला हा विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मिळाला आहे. मात्र हा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे. मागिल निवडणुकीत शेकापचा उमेदवार थोड्या मताने पराभूत झाला होता. दिवंगत गणपतराव देशमुख यांचा हा मतदार संघ आहे. शेकापचा हा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे हा मतदार संघ शेकापला मिळाला असे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे. देशमुख हे या मतदार संघातून निवडणूकर रिंगणात उतरणार आहे. शरद पवारांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीचा उमेदवार आपणच असू. तसे न झाल्यास स्वतंत्र पणे निवडणुकीच्या मैदानात उतरू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Live Update : 2024 निवडणूक महाराष्ट्रासाठी टर्निंग पॉइंट असेल - सुप्रिया सुळे
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने या मतदार संघातून दिपक सोळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सोळुंखे हे कामालाही लागले आहे. त्यांनी आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहोत असे सांगितले आहे. आपली उमेदवारीही जाहीर झाली आहे. शिवाय मतदार संघात आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आपल्या मागे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आघाडीचा उमेदवार आपणच आहोत हे त्यांनी सांगितले आहे. शरद पवारांचा ही आपल्यालाच पाठींबा असल्याचा दावा त्यांनी केली.
ट्रेंडिंग बातमी - चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज
सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाची पारंपारिक जागा आहे. मात्र इथला विद्यमान आमदार शिवसेनेचा आहे. त्यामुळे या जागेवर उद्धव ठाकरे यांनी दावा केला होता. शिवाय त्यांनी उमेदवारी ही घोषित केली. तर दुसरीकडे शेकापचे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी आपल्याला शरद पवारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मविआचा उमेदवार आपणच असू असे जाहीर पणे सांगितले आहे. शिवाय रोहित पवार यांनीही देशमुख कुटुंबीयानाच सांगोल्याची जागा मिळाली असे म्हटले आहे. त्यामुळे ऐन वेळी काय घडामोडी घडतात हे पाहावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world