जाहिरात

अजित पवारांची कुणीही टिंगल करू लागले, पण....! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे भावनिक पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवार यांच्यापाठीशी जवळपास 37 आमदार उभे राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या वाट्याला 59 जागा आल्या होत्या.

अजित पवारांची कुणीही टिंगल करू लागले, पण....! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे भावनिक पत्र
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election 2024)  23 नोव्हेंबर रोजी लागला. हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत महायुती 236 जागांवर विजयी होताना दिसत होती तर महायुती 48 जागांवर विजयी होताना दिसत होती. महायुतीमध्ये भाजप 133 जागांवर, शिवसेना  57  जागांवर तर अजित पवार 41 जागांवर विजयी होत असल्याचे दिसत होते.  

नक्की वाचा : CM पदावरुन राडा ते जागा वाटपाचा घोळ; मविआच्या दारुण पराभवाची 5 मोठी कारणे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवार यांच्यापाठीशी जवळपास 37 आमदार उभे राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या वाट्याला 59 जागा आल्या होत्या. यातील 41 जागांवर अजित पवारांचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवारांसोबत जितके आमदार होते त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत.

नक्की वाचा : Exclusive - मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी इशाऱ्यातून सांगून टाकले

अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले. बारामतीमधून निवडणूक लढवणारे अजित पवार हे त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि महायुतीसाठी राज्याच्या विविध भागात दौरे करताना दिसले. या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या अजित पवारांचे कष्ट त्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याने पत्राद्वारे मांडले आहेत. 

कधी झोपायचे कधी उठायचे काहीही कळत नव्हते !
संग्राम कोते पाटील हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. या तरुण नेत्याने अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकीसाठी घेतलेले कष्ट जवळून बघितले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 

"वयाची पासष्ट वर्षे ओलांडली. सगळी संकटे, बदनामी चारी बाजूने आलेली. स्वकीय जास्त विरोध करत होते. लोकसभा निवडणुकीत पत्नीचा पराभव झालेला.. राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याच्या चर्चा हितशत्रूंनी सुरु केलेल्या.

अजितदादा यांच्या सगळ्या वजाबाकीच्या बाजू वर उल्लेख केलेल्या अशा परिस्थितीत याही वयात या माणसाजवळ असलेली दुर्दम्य, इच्छाशक्ती आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी हे सगळं मला जवळून बघता आले. मी निवडणूक काळात दादांच्या सोबत होतो.हा माणूस कधी झोपायचा आणि कधी उठायचा काहीही कळत नव्हते. लोकसभा पराभवांतर कोणीही टिंगल करत होते.काहीही वावड्या उठवल्या गेल्या मात्र हा माणूस कोणतीही प्रतिक्रिया न देता काम करत राहिला...

निवडणूक काळात दादांनी एकूण 48 सभा घेतल्या. या काळात विमानातून प्रवास करत असताना सोबत असायची पिठलं भाकरीची शिदोरी आणि बहिणीनी प्रेमाने दिलेल्या चकल्या लाडू.. हे आशीर्वाद...

तात्यासाहेबांचा मुलगा भारी ठरला

दादांच्या वडिलांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नाही. त्यांना तात्यासाहेब म्हणायचे. ते पैलवान होते. शरद पवार साहेबांच्या राजकारणाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा राहिला. ते पैलवान होते. त्यांना चित्रपट क्षेत्राची आवड होती.. व्ही शांताराम यांच्यासोबत त्यांनी काम केले होते..
आजच्या संघर्ष आणि संकटाच्या काळात हा तात्यासाहेब यांचा मुलगा भारी ठरला आहे..

या वयातही त्यांनी घेतलेले कष्ट पाहता, जे तरुण राजकारणात येऊ बघत आहेत त्यांच्यासाठी हे आदर्श घ्यावे असेच आहे. दिनांक सोळा ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या माणसांने घेतलेली मेहनत बघताना या अफाट माणसाच्या जिद्दीचे दर्शन झाले..जिंकणारी लढाई जिंकणे सोपे पण हरणारी लढाई जिंकण्याची किमया दादांनी केली आहे..

तरुणपणी एवढं कष्ट घेणे शक्य असते पण याही वयात दादांनी दिलेली लढत आणि सोबत विश्वासाने आलेल्या आमदारांना मानाने सभागृहात घेऊन जाणे बघता महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पर्व सुरु झाले आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com