'तुम्हाला बाई खुणावेल, पण जायचं नाही', अमरावतीमध्ये बोलताना राऊतांची जीभ घसरली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं पूर्ण शक्ती लावली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. (फाईल फोटो)
अमरावती:

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना टार्गेट केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवास्थानाच्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न नवनीत राणा यांनी केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राणा यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटानं पक्षानं पूर्ण शक्ती लावली आहे. या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद केली.  या पत्रकार परिषदेत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. ही टीका करताना राऊत यांची जीभ घसरल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले राऊत?

संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षासह नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. ' या देशाच्या छाताडावर मोदी नावाचा राक्षस बसलेला आहे त्याला दूर करणे गरजेचे आहे. आम्ही मुंबई वाचवली म्हणूनच लोक आम्हाला एक दाऊद एक राऊत असं म्हणतात.

भाजपानं महाराष्ट्राला नामर्द केलं. तुम्हाला विकासाचं पोरगं झालं नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता.  तुम्हाला बाई प्रेमाने बोलवेल. तुम्हाला बाई खुणावेल आहे मात्र तुम्ही बळी पडायचे नाही,' या शब्दात त्यांनी टीका केली. 

ज्या बाईने मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न केला,त्या बाईचा पराभव करणार हे शिवसेनेचं नैतिक कर्तव्य आहे. नवनीत राणा यांचा पराभव करणे हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे असे समजावे, असं राऊत यांनी बजावलं.  

आम्ही कायदेशीर आणि बेकायदेशीर शस्त्र चालवतो म्हणून शिवसेना टिकून आहे. आमदार खासदार येतात आणि जातात मात्र संघटन राहिलं पाहिजे.  शिवसेनेला नेते सोडून गेले असले तरी शिवसैनिक मात्र जागेवरच आहे. अमरावतीमधून एक सच्चा कार्यकर्ता लोकांमधून जाण्यात अडचण नाही. आत्तापर्यंत इथं दिखावे झाले, थापेबाजी झाली दंगली घडवल्या त्याचा परिणाम अमरावतीच्या मतदारसंघावर होईल असं वाटत नाही, असं राऊत यांनी सांगितलं. 

Advertisement

अमरावतीत विरोधकांची एकी, वाढवणार नवनीत राणांची डोकेदुखी?
 

मुख्यमंत्र्यांवर टीका

देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली मात्र त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही. केवळ दोन दोन पक्ष फोडले हेच त्यांचं क्वालिफिकेशन आहे.  आमच्याकडून जे त्यांच्याकडे गेले त्यांनी गुलामी शिवाय दुसरं काहीही पत्करलेलं नाही. हे दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्या घराबाहेर बसतात. लाचार आणि लोचट मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पहिल्यांदाच बघितलाय, अशी त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.

तो भाजपा वेगळा होता 

कोरना काळात नरेंद्र मोदींनी थाळ्या वाजवायला सांगितल्या, 'गो कोरोना गो' असा संदेश लोकांना द्यायला सांगितला. त्याप्रमाणे आता लोकं त्यांना 'गो मोदी गो' ही घोषणा देण्यास तयार आहेत. आम्ही ज्या भाजपासोबत काम केलं तो वेगळा होता. तो अटलजींचा पक्ष होता. हा मोदींचा पक्ष आहे. राहुल गांधी यांनी भाजपा 150 जागा मिळणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केलाय. राहुल गांधी यांनी आजवर ज्या भूमिका मांडल्या आहेत, त्या खऱ्या ठरल्या आहेत. मोदींना 400 पार जागा द्याव्या असं त्यांनी काय केलं आहे? हा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Advertisement

'भाषण ठोकून, उपोषण करून कायदा बदलत नसतो' पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे?
 

विदर्भ चमत्कार करेल

महाराष्ट्रावर सर्वांचं लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस काही म्हणून दे आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू. हे आमचं मिशन नाही तर आत्मविश्वास आहे. त्यामध्ये अमरावतीसह विदर्भातील सर्वाधिक जागा असतील. विदर्भ यावेळी मोठा चमत्कार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.