'4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा होण्या आधी, खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा आणि त्याच बरोबर राज ठाकरे यांच्यावर टिकेचा हल्ला चढवला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीची सभा होण्या आधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे सभा घेणार आहेत. तर बीकेसीमध्ये ठाकरे, केजरीवाल आणि खरगे यांची संयुक्त सभा होत आहे. त्याआधी खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा आणि त्याच बरोबर राज ठाकरे यांच्यावर टिकेचा हल्ला चढवला आहे. त्याचे पडसाद आता काय उमटतात ते पाहावे लागतील. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'राज ठाकरेंचे दुकान बंद होणार' 

शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्यावर टिका केली. ज्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही अशी वक्तव्य केली त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन ते आज बसणार आहेत. हे महाराष्ट्रातली जनता पाहाणार आहे. मात्र 4 जून नंतर महाराष्ट्रातली काही दुकानं कायमची बंद होणार आहेत. त्या  पैकी एक दुकान हे राज ठाकरेंच्या सुपारीचं दुकान आहे अशी बोचरी टिका राऊत यांनी केली आहे. 

हेही वाचा - मुंबईत वाकयुद्ध रंगणार! मोदी राज एकाच मंचावर तर केजरीवालही ठाकरेंच्या जोडीला

मोदी, अमित शहांनाही केले लक्ष्य

यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लक्ष्य केले आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयां विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना जवळ केले गेले नाही. आता मोदी राज ठाकरेंबरोबर दिसणार आहेत अशी टिका राऊत यांनी केली. शिवाय मोदींना महाराष्ट्रात येवढ्या सभा का घ्याव्या लागत आहेत असा प्रश्नही त्यांनी केला. देशात सध्या मोदी आणि शहा यांच्या विरोधात लाट आहे असे ही ते म्हणाले. भाजपचे महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान हे देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचेही राऊत म्हणाले. 

हेही वाचा - लोकसभा निवडणुकीतील मतदानावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; महिला सरपंचाचे कुटुंब गंभीर जखमी

मविआची होणार पत्रकार परिषद 

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहे. त्या आधी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद ग्रँड हयात इथे होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुंबईतल्या सहा लोकसभेच्या जागां पैकी चार जागा शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढत आहे. तर दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. 

Advertisement