जाहिरात
This Article is From Apr 17, 2024

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?
सोलापूर:

काँग्रेसमधून भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश घेतला. अशोक चव्हाण, बसवराज पाटील अशा एका मागून एक दिग्गजांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यात आणखी एका बड्या नावाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते म्हणजे काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे. मधुकरराव चव्हाण यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरात भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी नेते आणि विद्यमान भाजप नेते बसवराज पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे चव्हाणही भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. 

फडणवीस - चव्हाण भेट 
देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्या आधी महाविकास आघाडीच्यावतीने ओमराजे निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मधुकरराव चव्हाण उपस्थित नव्हते. यावेळी त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. त्याच वेळी ते नाराज असल्याची चर्चा होती. आता तर फडणवीसांची भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. 

हेही वाचा - अमेठीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी सोडलं मौन, निवडणूक लढवण्यावर दिलं उत्तर

कोण आहेत मधुकरराव चव्हाण? 
मधुकरराव चव्हाण हे काँग्रेसचे जुन्याजाणत्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. तुळजापूर विधानसभा मतदार संघ हा त्यांचा गड होता. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. भाजपच्या राणाजगजितसिंह यांनी त्यांचा पराभव केला. ते या मतदार संघातून पाच वेळा विजयी झाले होते. या मतदार संघातून सलग चार वेळा जिंकण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. मात्र 2019 ला वंचितमुळे त्यांच्या विजयाचे गणित बिघडले आणि 1995 नंतर पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.     

हेही वाचा - UAE Rain : निसर्गाशी छेडछाड करणं महागात पडलं? वाळवंटात पूर येण्याचं कारण काय?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com