उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यात प्रचार सभा घेतली होती. त्या प्रचार सभेत उद्धव यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला शहाजी बापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हा बिनकामाचा माणूस आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदाही तोंड दाखवलं नाही. आमदार म्हणून आमची त्यांनी काय लायकी ठेवली असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. शिवाय त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंची नक्कल ही केली. सांगोली विधानसभा मतदार संघातून शहाजी बापू पाटील यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या दिपक साळुंखे यांचे आव्हान आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगोला इथे शहाजी बापू पाटील यांची जाहीर प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटाचा पोरगा आहे. पण स्टेजवर आल्यावर कवायती करतात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सारखे हावभाव केले. भाषण करताना ते आता कवायती करत आहेत असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे बिनकामाचा माणूस आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांचं एकदाही तोंड बघितले नाही. त्यांनी आमदार म्हणून आमची लायकी काय ठेवली. असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांना आम्हीच मुख्यमंत्री केले. शिंदेंनी आम्हाला सांगितलं होतं, की त्यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी काहीच काम केलं नाही.
ट्रेंडिंग बातमी - '...तर बाळा साहेबांनी उद्धव ठाकरेंचा हात मोडला असता' राणेंनंतर कदम हे काय बोलले?
शहाजी बापूंनी टीका करण्या आधी उद्धव ठाकरे यांनीही सांगोल्यात जाहीर सभा घेतली होती. या सभेत उद्धव यांनी शहाजी बापू पाटील यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. या गद्दाराला 23 तारखेला गुवाहाटीला कायमचं पाठवायचं आहे असं त्यांनी सांगितलं होते. काय झाडी काय डोंगरचा उल्लेख करत, कायमचं त्यांना झाडी आणि डोंगर मोजायला पाठवायचं आहे असंही उद्धव त्यावेळी म्हणाले होते. शिवाय शहाजी बापू यांनी गुवाहाटीचे डोंगर बघीतले आहेत. पण त्यांना रायगडचं टकमक टोक माहित नसेल. त्यावरूनच त्यांचा कडेलोट करायचा आहे असेही उद्धव म्हणाले होते.
ट्रेंडिंग बातमी - 'गावात येऊन रोज तुमचे मुके घ्यायचे काय?' भाजप उमेदवार असं का बोलले?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. बंडानंतर शहाजा बापू पाटील यांनी उद्धव ठाकरें ऐवजी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांनाच परत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. मागिल वेळी दिपक साळुंखे यांनी शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा दिला होता. यावेळी ते स्वत: मैदानात आहेत. शिवाय शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार ही मैदानात आहे. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world