महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा शिल्लक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. नाशिकमध्येही मोदींनी महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. या सभेत एका युवकाने कांद्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी सभे ठिकाणी काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्रनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावरून आता राजकारण चांगलेच पेटले आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना कानपिचक्या दिल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कांदा वांदा करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आले होते. नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न मोठा आहे. अशा वेळी पंतप्रधान तिथे येऊन कांद्यावर बोलत नसतील तर ती बाब गंभीर आहे. नाशिकमध्ये याआधीही नेत्यांच्या सभामध्ये कांद्याचा विषय गाजला आहे. काही ठिकाणी तर कांदे फेकल्याचाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्या तरूणाने मोदींना काद्यावर बोला हा केलेला प्रश्न हा योग्य होता असे शरद पवार यांनी सांगितले. नाशिक,धुळे, सातारा पुणे इकडे कांद्याचा विषय आहे. कांद्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. अशा वेळी पंतप्रधान येतात आणि काद्यावर बोलत नाहीत याचा राग शेतकऱ्यांमध्ये आहे. याभागातील लोक हे जागृत आहेत. या आधीही इथल्या लोकांनी कांग्या बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी राजकीय सभामध्ये कांदे फेकले गेले आहेत. याची आठवण यावेळी पवार यांनी मोदींना करून दिली. त्यामुळे हा कांदा आता वांदा करतो का हे पहाले लागले.
हेही वाचा - बाप लेकीच्या नात्याला डाग, तेरा वर्षीय लेकीवर बापानेच टाकला हात
माझ्या पक्षाची मोदींना चिंता का?
यावेळी बोलताना त्यांनी मोदी माझ्या पक्षाची चिंता का करत आहेत असा प्रश्न विचारला. शिवाय उद्धव ठाकरेंच्या सेनेले ते नकली सेना म्हणत आहेत. याचा अर्थ मोदींकडे बोलण्यासारखे काही नाही हे स्पष्ट होते. शिवाय सर्व शिवसैनिक हे ठाकरेकडेच आहेत असंही पवार यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीचा निकाल काय असणार याचा अंदाज मोदींना आला आहे. त्यामुळेच ते मुद्दे भरकटवण्याचे काम करत आहेत असा आरोपही पवारांनी यावेळी केला.
हेही वाचा - आईवडील अडकले ढिगाऱ्याखाली, लेक परदेशात; 55 तासांनंतर असा लागला शोध
मुंबईतल्या रोड शोवरही टिका
नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केलेल्या रोड शोवरही शरद पवारांनी टिका केली. हा रोड शो करणं म्हणजे शहाणपणाचे लक्षण नाही असे ते म्हणाले. ज्या भागात हा रोड शो केला तो गुजराती भाग होता. तिथं करण्या ऐवजी त्यांनी मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवर तो केला पाहीजे होता. या रोड शो मुळे मुंबईकरांना मोठा त्रास झाल्यचेही ते म्हणाले. अनेक लोकांनी याबाबत तक्रारीही केल्या.
हेही वाचा - यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर
राज ठाकरे कुठे आहेत?
यावेळी बोलतांना शरद पवारांनी राज ठाकरे यांनाही चिमटे काढले. ते म्हणाले राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचे स्थान काय आहे हे माहित नाही. नाशिक हा त्यांचा गड आहे असे म्हणतात. पण ते इकडेही दिसत नाही असा चिमटाही शरद पवारांनी यावेळी काढला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world