जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

काँग्रेसच्या ताब्यातील चंद्रपूर पुन्हा जिंकण्यासाठी भाजपासमोर 3 मोठी आव्हानं

Chandrapur Lok Sabha Election 2024 : पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपा यंदा जय्यत तयारीनं मैदानात उतरलाय.

काँग्रेसच्या ताब्यातील चंद्रपूर पुन्हा जिंकण्यासाठी भाजपासमोर 3 मोठी आव्हानं
Sudhir Mungantiwar Pratibha Dhanorkar : सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात चंद्रपूरमध्ये थेट लढत होत आहे.
चंद्रपूर:

Chandrapur Lok Sabha Election 2024 :  2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र' करण्याचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न चंद्रपूरमुळे पूर्ण होऊ शकलं नव्हतं. त्या निवडणुकीत संपूर्ण विदर्भात मोदी लाट असतानाही चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपा खासदार हंसराज आहिर यांचा पराभव केला होता. पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपा यंदा जय्यत तयारीनं मैदानात उतरलाय.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा देखील याच मतदारसंघात झाली होती. भाजपानं संपूर्ण जोर लावला असला तरी त्यांना चंद्रपूर जिंकण्यासाठी 3 प्रमुख आव्हानांवर मात करावी लागणार आहे.

सहानुभूती फॅक्टर : बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसनं तिकीट दिलं आहे. बाळू  धानोरकर यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्याचबरोबर प्रतिभा धानोरकर या स्वत: वरोरा येथील आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघात केलेल्या कामाचाही धानोरकरांना फायदा मिळू शकतो.

पक्षांतर्गत नाराजी :  चंद्रपूर मतदारसंघातून हंसराज आहिर पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. भाजपानं त्यांना डावलून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेनंतर भाजपामधील सर्व गट नाराजी बाजूला करुन कामाला लागले आहेत. पण, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही हे सक्रीय राहण्याचं आव्हान मुनगंटीवार यांच्यापुढं असेल.

Solapur Loksabha : 2 तरुण आमदारांमध्ये कांटे का मुकाबला, शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!
 

कुणबी समाजाची मतं : चंद्रपूर मतदारसंघात मोठ्या संख्येनं असलेला आदिवासी मतदार हा भाजपाचा आधार आहे. पण, मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसनं कुणबी समाजाच्या प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी दिलीय. मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर या लढतीत गैर-कुणबी ओबीसी मतदारांना आपल्या कडे वळविण्याचे मोठे आव्हान आहे.

बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार असलेले सुधीर मुनंगटीवर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते आहेत. त्यांना आजवर केलेल्या विकासकामांच्या आधारावर लोकसभेतही मतदार कौल देतील अशी आशा आहे. तर प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूतीची लाट आणि वरोरामधील आपल्या मतदारांवर अवलंबून राहावं लागेल.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अवस्थेला नाना पटोले जबाबदार? कार्यकर्त्यांनी मनातलं सांगून टाकलं
 

चंद्रपूरचा इतिहास

पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. 1952 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतरची चार दशकं चंद्रपूरवर काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1996 साली भाजपाच्या हंसराज आहिर यांनी इथून पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 मध्ये अहीर  पुन्हा एकदा विजयी झाले. 2019 साली काँग्रेसनं पुनरागमन करत चंद्रपूरची जागा ताब्यात घेतली. मागील निवडणुकीत सुरेश धानोरकर यांनी अहीर यांचा पराभव केला होता. धानोरकरांचं मे 2023 मध्ये निधन झालं. त्यानंतर ही जागा रिक्त आहे


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी तीन जागा भाजपाकडं असून एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिलाय. तर, उर्वरीत दोन जागा काँग्रेसकडं आहेत. 

कधी होणार मतदान? : लोकसभा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com