जाहिरात

पुणे तिथं काय उणे! लोकसभा निकाला आधीच विजयाचे फ्लेक्स

लोकसभेच्या निकालाची वाट पाहण्या आधीच पुणेकरांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारीची विजयी म्हणून घोषणाच करून टाकली आहे. ऐवढेच नाही तर त्यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्सही लावले आहेत.

पुणे तिथं काय उणे! लोकसभा निकाला आधीच विजयाचे फ्लेक्स
पुणे:

प्रतिक्षा पारखी 

पुणे आणि अजूबाजूच्या लोकसभा मतदार संघात मतदानाची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती 4 जूनची. याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र निकालाची वाट पाहण्या आधीच पुणेकरांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारीची विजयी म्हणून घोषणाच करून टाकली आहे. ऐवढेच नाही तर त्यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्सही लावले आहेत. पुण्याच्या प्रमुख ठिकाणी हे फ्लेक्स दिसून येत असून ते आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यभरात नुकतंच चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. पुण्यामध्ये मतदान पार पडल्यानंतर 13 मे  ला संध्याकाळी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे फ्लेक्स शहरात लावण्यात आले होते. "कोथरूड पद ते कर्तव्य पद" अशा आशयाचे हे बॅनर पुण्यामध्ये लावण्यात आले होते. पुण्याचे भावी खासदार म्हणून देखील यामध्ये उल्लेख झाला होता. 

हेही वाचा - मोदींच्या सभेआधीच शिंदेंना दणका, थेट कल्याण जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा

तर दुसरीकडे पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ,सुप्रिया सुळे, आणि अमोल कोल्हे यांच्या विजयाचे देखील फ्लेक्स लावण्यात आले. या फ्लेक्सवर विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. शिवाय गुलाल आमचाच असेही सांगण्यात आले आहे. 'मतदारांनी निर्धार करून मारलाय शिक्का, खासदार आमचा झालाय पक्का' असा उल्लेख ठळकपणे बॅनरवर करण्यात आलाय. त्याच्यामुळे निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच पुण्यामध्ये आपापले उमेदवार हे स्वयंघोषित विजयी करण्यात येत आहेत. अशा प्रकारे पुण्यामध्ये निवडणुकीनंतर फ्लेक्स बाजीला उधाण आलेला आहे.

हेही वाचा - सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने डोक्यात गोळी झाडत स्वत:ला संपवलं, कारण काय?

पुणे लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहळ यांच्यात लढत होत आहे. तर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या आमने सामने ठाकल्या आहेत. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे तर अजित पवार गटाचे शिवाजी अढळराव पाटील हे रिंगणात आहेत.