जाहिरात
This Article is From May 16, 2024

दिव्यांगांसाठी महत्त्वाची बातमी, मतदान करणे होणार अधिक सोपे

मुंबईतल्या दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी महत्त्वाची बातमी, मतदान करणे होणार अधिक सोपे
मुंबई:

मुंबईत 20 मे ला मतदान होणार आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या दिवशी मुंबईतल्या दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुंबईतल्या जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच 85 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच 85 वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - सावरकरांचं नाव घेत शिवसेना 'उबाठा'ला आव्हान, कल्याणच्या सभेत मोदी काय म्हणाले?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व  तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

हेही वाचा - यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेचे मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व,  मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सात हजार 384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघात एकूण 7384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 40 लाख 02 हजार 749 पुरुष, 34 लाख 44 हजार 819 महिला, तर 815 तृतीयपंथी असे एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com