जाहिरात

BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीला बंडखोरीची लागण! किती जाणांनी केली बंडखोरी? पाहा संपूर्ण लिस्ट

या यादीत आणखी काही नावांची भर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे, मनसेमध्ये ज्या प्रमाणे बंडखोरांनी डोकं वर काढलं आहे तसचं अन्य पक्षातही बंडखोर आहेत.

BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीला बंडखोरीची लागण! किती जाणांनी केली बंडखोरी? पाहा संपूर्ण लिस्ट
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती.
  • ठाकरे बंधूंच्या युतीत अनेक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.
  • शिवसेना ठाकरे गटाचे सात आणि मनसेचा एक उमेदवाराने बंडखोरी केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली होती. उमेदवारांनी फोन करुन कार्यालयात बोलवले जात होते. त्यानंतर एबी फॉर्म दिले जात होते. मात्र याची कल्पना इच्छुक उमेदवारांनी मिळताच त्यांनी ही बंडाचा झेंडा फडकवला आहे. मुंबई महापालिकेत अनेक वार्डात बंडोबांनी डोकं वर काढलं आहे. सर्वच पक्षात हे बंडोबा आहेत. त्यात सर्वाधिक बंडखोर उमेदवार ठाकरे बंधूंच्या युतीला असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहेत. त्यामुळे या बंडोना आता थंड कसं करायचं हे आव्हान ठाकरे बंधू समोर आले. 

नक्की वाचा - Election 2026: शिवसेना-भाजपची युती कुठे तुटली? कुठे एकत्र, कुठे विरोधात? पाहा युतीच्या बिघाडीची संपूर्ण यादी

सुरूवातीला जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार ठाकरे बंधूंच्या युतीतल्या 8 जणांनी बंडखोरी केली आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे जवळपास 7 बंडखोर आहेत. तर एक मनसेचा बंडखोर रिंगणात उतरला आहे. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे  चंद्रशेखर वायंगणकर यांनी वार्ड क्रमांक 95 मधून बंडखोरी केली आहे. शिवा. वार्ड क्रमांक 106, सागर देवरे, 169 कमलाकर नाईक, 193 सूर्यकांत कोळी, 196 संगीता जगताप, 202 विजय इंदुलकर, 203 दिव्या बडवे यांनी आपल्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी केली आहे. तर मनसेच्या अनिशा माझगांवकर यांनी वार्ड 114 मध्ये बंडखोरी केली आहे. 

नक्की वाचा - Kalyan News: KDMC मध्ये कोणाची युती? कोणाची आघाडी? कुणाच्या वाट्याला किती जागा? वाचा फायनल जागा वाटप

ठाकरे मनसे युतीच्या बंडखोरांची यादी 

  • 95 चंद्रशेखर वायंगणकर, UBT
  • 106 सागर देवरे, UBT
  • 114 अनिशा माझगांवकर, मनसे 
  • 169 कमलाकर नाईक UBT
  • 193 सूर्यकांत कोळी, UBT
  • 196 संगीता जगताप, UBT
  • 202 विजय इंदुलकर, UBT 
  • 203 दिव्या बडवे,UBT

या यादीत आणखी काही नावांची भर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे, मनसेमध्ये ज्या प्रमाणे बंडखोरांनी डोकं वर काढलं आहे तसचं अन्य पक्षातही बंडखोर आहेत. तर कुर्ला विधानसभा मतदार संघातील वॉर्ड क्रमांक 169 मधून भाजपचे मुंबई सचिव अमित शेलार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इथं शिवसेना शिंदे गटातचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी आपल्या मुलाला उमदेवारी दिली आहे. पण त्याला भाजपने विरोध करत शेलार यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. दरम्यान उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर बंडोबाना कसे थंड करायचे याची रणनिती आखण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com