मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीने काही महत्वाच्या सुचना आपल्या उमेदवारांना केल्या आहेत. त्याबाबत एक ऑनलाईन बैठकही घेण्यात आली आहे. सगळ्या लोकांना काउंटिंगसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शिवाय मतमोजणी दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे ते ही सांगितले आहे. पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचं नाही अशा सूचना दिलेल्या आहेत असंही वडेट्टीवार म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण सत्तेत येईल ते शनिवारी कळेलच. बारा ते एक वाजतेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेले तुम्हाला दिसेल. सत्तेतला आमदार म्हणून मी राहील असा विश्वासही यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले याचा विश्वास नाही तर खात्री आहे. महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा शनिवारी रात्रीच करणार असल्याचंही ते म्हणाले. मविआला 160 ते 165 जागा मिळतील असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'सगळ्यांना माझी गरज लागते,पण...' विरारमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकूर कोणा बरोबर?
मुख्यमंत्रिपदाबाबत हाय कमांड जो निर्णय घेईल तो अंतिम असेल. पक्षाने दोन वेळा विरोधी पक्ष नेतापद सांभाळायला दिले आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे समर्थपणे पार पाडली आहे. त्यामुळे आता सत्ता येणार आहे. शिवाय मी सत्तेत असेन असेही वडेट्टीवार म्हणाले. जे काम हाती घेतलं ते काम प्रामाणिकपणे पूर्ण केलं.
दरम्यान बहुमत मिळाल्यानंतर बारा तासाच्या आत मुख्यमंत्री कोण असेल हे आम्ही घोषित करू असंही ते म्हणाले. शिवाय जे आमदार म्हणून निवडून येतील त्या सर्वांना त्याच दिवशी रात्री मुंबईत बोलवले आहे. विदर्भाची जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. माझ्यावर हाय कमांड ने ती सोपवलेली आहे असेही ते म्हणाले. दरम्यान मतमोजणी वेळी आणि नंतर काय करायचे याबाबत शरद पवारांनी मार्गदर्शन केल्याचे ते म्हणाले. शिवाय खरगे ही वेळोवेळी मार्गदर्शन करत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान जे बंडखोर काँग्रेस विचारांचे आहेत, त्यांच्या बरोबर संपर्क केला जात असल्याचंही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world