जाहिरात
Story ProgressBack

'निवडून येणार अन् काँग्रेस खासदार म्हणूनच राहणार'

Read Time: 3 min
'निवडून येणार अन् काँग्रेस खासदार म्हणूनच राहणार'
सांगली:

सांगली लोकसभेसाठी मतदान प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या मतदार संघात काँग्रेस बंडखोर विरुद्ध भाजप आणि शिवसेना ठाकरे गट अशी तिरंगी लढत झाली. महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेचे काम करतील अशी ठाकरेंची अपेक्षा होती. मात्र काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या एका वक्तव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणाचे काम केले हेच स्पष्ट केले आहे. शिवाय निवडून आलो तर काँग्रेसचा खासदार म्हणूनच आपण राहाणार आहोत असेही विशाल पाटील यांनी जाहीर पणे सांगितले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'जन्म काँग्रेसमध्ये, आयुष्यभर काँग्रेस बरोबरच' 

विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूकही लढवली. ही निवडणूक भाजपचे संजयकाका पाटील विरूद्ध विशाल पाटील अशीच होत आहे. या लढतीत शिवसेनेचे चंद्रहार पाटील काहीसे मागे पडल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी विशाल पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपला जन्म हा काँग्रेसमध्येच झाला आहे. त्यामुळे आयुष्यभर आपण काँग्रेसमध्येच राहाणार आहोत. वसंतदादांचे पुर्ण कुटुंब हे काँग्रेस विचारांचे आहे. त्यामुळे दुसरा विचार आपण कधीच करू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण सांगलीचे खासदार होणार आहे. काही झालं तरी विजय हा आपलाच आहे असा दावा विशाल पाटील यांनी केला. खासदार झाल्यानंतर काँग्रेस खासदार म्हणूनच आपण असू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा - मतदान केलं अन् मिळाली हिऱ्याची अंगठी, नेमकं काय घडलं?

निवडणुकीत काँग्रेसची मदत      

सांगली जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद आहे. युवा वर्गही काँग्रेस बरोबर आहे. जागा वाटपात ही जागा काँग्रेसला सुटली नाही. पण कार्यकर्त्यांची तशी इच्छा होती. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष जरी लढलो असलो तरी काँग्रेसची संपुर्ण ताकद आपल्या मागे होती असा दावा विशाल पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांनी विश्वजित कदम यांचे ही कौतूक करत त्यांचाही आपल्याला एक प्रकारे पाठिंबाच होता असे अप्रत्यक्षपणे सांगितले. आपल्यासाठी प्रत्येक बुथवर काँग्रेस कार्यकर्ते झटले असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार?  

'भाजप - सेना उमेदवाराची एकच भाषा' 

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी सुरूवातीपासून षडयंत्र रचली गेली असा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे. ही जागा आधी वंचितला देण्याची चर्चा होती. मात्र त्याल प्रकाश आंबेडकर बळी पडले नाहीत. पण शिवसेनाल त्याला बळी पडली, असेही पाटील म्हणाले. शिवाय भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार हे एकच भाषा बोलत आहेत. ते माझा विरोधात बोलत आहेत असेही पाटील यांनी स्पष्ट केले. ज्या वेळी ते दोघेही माझा विरोधात बोलत होते त्याच वेळी आपला विजय निश्चित झाला होता असेही त्यांनी सांगितले. वसंतदादा घराण्याला संपवण्याचा डाव होता. मात्र तो आपण उधळवून लावला आहे.  दरम्यान या निवडणुकीत पैसा आणि यंत्रणेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination