मुख्यमंत्री झाल्यास कोणता निर्णय घ्यायला आवडेल या प्रश्नाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी भन्नाट उत्तर दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी NDTV मराठीच्या लाँचिंग वेळी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी खास मुलाखत श्रीरंग खरे यांनी घेतली. यावेळी बोलताना ते बोलत होते. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री होणार की नाही या बाबत पहिल्यांदाच भाष्य केले. शिवाय ज्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा होती त्यांचे दोन वर्षापूर्वी काय झाले असे ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
हेही वाचा - 'नव्या महाराष्ट्राचा नवा आवाज', NDTV मराठीचं शानदार लोकार्पण
श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केले. मुख्यमंत्री झाल्यास कोणता निर्णय घ्यायला तुम्हाला आवडेल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्यांनी, मुख्यमंत्री होण्याची माझी महत्वकांक्षा नाही. काही लोकांची तशी होती. त्यांचे दोन वर्षापूर्वी काय झाले ते तुम्ही पाहीले आहे. अंथरूण बघून पाय पसरावेत असं मला वाटतं. माझे वडील चांगले काम करत आहेत. ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या बरोबरीने महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेत आहेत. अशी प्रतिक्रीया श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - पालघरची जागा भाजपा लढवणार, 'NDTV मराठी' च्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा
मुंबई बरोबरच एमएमआर रिजनचाही विकास होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गेल्या दोन वर्षात पावलं टाकली जात आहेत.
अनेक जण ठाणे कल्याण, अंबरनाथ, बदलापूर पासून प्रवास करत असतात. त्यांना चांगल्या कनेक्टीव्हीटीची गरज आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. त्यात मेट्रो असेल, मोठे रस्ते असतील, भुयारी मार्ग असेल, असे गेमचेंजर प्रकल्प होत आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचत आहे. रेल्वेच्या सुविधेतही सुधारणा झाली आहे. तिसरी मुंबई ही नवी मुंबई आणि कल्याण याच्या मध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यावरचा लोड कमी होईल. याभागात भविष्यात रोजगार निर्मितीही होईल असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. यादृष्टीने काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'सध्याच्या काळात निवडणूक लढणं जड झालयं' NDTV मराठीला पटेलांची खास मुलाखत
NDTV मराठीच्या लाँचिंग निमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय सगळीकडे सध्या स्पर्धा आहे. पण ब्रेकिंग न्युजच्या युगात मोठी स्पर्धा आहे. कुठल्याही न्युजला ब्रेकिंग केली जाते. एकाने केली का दुसरा तिच बातमी ब्रेक करतो. NDTV ने मात्र ब्रेकिंगच्या मागे न धावता, सत्य काय आहे ते मांडावे, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world