मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात कुणाला संधी मिळणार? महाराष्ट्रातून कुणाचं नाव आघाडीवर?

एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ येत्या रविवारी 8 जून रोजी संध्याकाळी पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आलं आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ येत्या रविवारी 8 जून रोजी संध्याकाळी पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळून शकते यावर एक नजर टाकुया. अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

(नक्की वाचा - पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम)

मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार?

एस जयशंकर
नितिन गडकरी 
राजनाथ सिंह
स्मृति ईरानी 
अमित शाह 
पीयूष गोयल 
चिराग पासवान 
बांसुरी स्वराज 
रामबीर सिंह बिधूडी 
राजीव प्रताप रूडी
अनुराग ठाकुर
गजेंद्र सिंह शेखावत
ललन सिंह
भूपेंद्र यादव

(वाचा - महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही' नावे आहेत चर्चेत)

जेडीयू आणि टीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील वाटा आणि विभाग याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पंतप्रधान याबाबत निर्णय घेतील अशीही माहिती समोर येत आहे. 

(वाचा -  कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेची माघार, कारण काय?)

शपथविधी सोहळ्यात कोण सामील होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यात, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू येऊ शकतात. त्यांना भारताचं निमंत्रण स्वीकारलं आहे. याशिवाय बांगालदेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकाचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूटाचे राजा जिगमे खेसर नामग्याल वांगयुक देखील येतील. 

Advertisement
Topics mentioned in this article