राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीनंतर फारसे प्रचारात दिसले नाहीत. बारामती लोकसभेचे मतदान झाल्यानंतर, अजित पवारांनी राज्यात इतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तेवढासाचा भाग घेतला नाही. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा आणि रोड शोला ही अजित पवार दिसले नाही. त्यामुळे अजित पवार अचानाक कुठे गायब झाले याची चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तिसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा 11 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा झाल्या. तर पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे जाहीर सभा झाली. त्यानंतर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो झाला. या सर्वात एक गोष्ट खटकत होती. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती.
हेही वाचा - राऊतांचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' बॅगांची तपासणी, बॅगेतून काय निघाले?
पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये जेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून अजित पवारांची अनुपस्थिती ही खटकणारी होती. धाराशीवमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसचा उमेदवार असतानाही अजित पवार तिथे प्रचार करताना दिसत नव्हते. बुधवारी दिंडोरीत झालेल्या आणि कल्याणमध्ये झालेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. नितीश कुमार हे आजारी असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. अजित पवार हे यावेळीही उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी प्रफुल पटेल हे हजर राहीले. त्यामुळे अजित पवार कुठे गेलेत? ते उर्वरीत टप्प्यांसाठीच्या प्रचारात का दिसत नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हेही वाचा - मोदींच्या सभेत गोंधळ, कांद्यावरून वांदा होणार? शरद पवार थेट बोलले
अजित पवार यांच्या कार्यालयाकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. अजित पवार यांची प्रकृती बरी नव्हती. डॉक्टरांनी त्यांना 2-3 दिवस आराम करायला सांगितला असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. नाशिकमध्ये आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार यांना खरेच बरे नसल्याचे म्हटले. 17 मे रोजी मुंबईमध्ये भाजप आणि मनसेतर्फे महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे या सभेत बोलणार आहेत. या सभेसाठीची वातावरण निर्मिती करण्याचे काम जोरात सुरू आहे. अजित पवार या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world