जाहिरात

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर

एकीकडे मित्रपक्षाचे प्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेत असतील, ते पाहाण्या शिवाय आता अजित पवार गटाला पर्याय राहीलेला नाही. मात्र अजित पवार गटावर ही वेळ का आली याचे कारण आता समोर आले आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर
नवी दिल्ली:

नरेंद्र मोदी यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी त्यांना एनडीएच्या मित्रपक्षांवर अलवंबून राहावं लागवे. अशा स्थितीत मंत्रिमंडळात मित्रपक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकही खासदार नसलेल्या रामदार आठवलेंनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. असे असले तरी अजित पवारांना एकामागून एक धक्के लागत आहे. ते थांबण्याचे नाव घेत नाही. मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना त्यांच्या पक्षाला मात्र मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे एकीकडे मित्रपक्षाचे प्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेत असतील, ते पाहाण्या शिवाय आता अजित पवार गटाला पर्याय राहीलेला नाही. मात्र अजित पवार गटावर ही वेळ का आली याचे कारण आता समोर आले आहे.  

हेही वाचा -  Modi 3.0: पहिल्यांदाच खासदार अन् थेट केंद्रात लॉटरी, पुण्याचे मोहोळ मंत्री होणार

मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसलाही मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. प्रफुल पटेल मंत्रीपदाची शपथ घेतली अशी चर्चाही होती. त्यानुसार सकाळपासूनच ज्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन गेले होते. त्यानंतर या सर्वांना पंतप्रधानांच्या निवसस्थानी ही बोलवण्यात आले होते. पण यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आला नाही. प्रफुल पटेल यांनी त्यानंतर सुनिल तटकरे यांचे घर गाठले होते. पटेल यांनी आपल्याला कोणताही फोन आला नाही हे स्पष्ट केल. शिवाय जे मंत्री शपथ घेणार आहेत त्यांची लिस्टही समोर आली. पण त्या लिस्टमध्येही अजित पवार गटाच्या कोणत्याही नेत्याचे नाव नव्हते. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. 

हेही वाचा - Modi 3.0 : तीन वेळा खासदार, वय अवघे 36, महाराष्ट्रातील एकमेव महिला नेता घेणार मंत्रिपदाची शपथ

यानंतर हलचालींना वेग आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद का नाही याचे उत्तर त्यांनीच दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. आघाडीतल्या रचने नुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला एक मंत्रिपद येत होते. त्यानुसार स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीपद त्यांना देवू केले होते. मात्र मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचे नाव अंतिम करण्यात आले होते. पण याआधी ते कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री करणे मान्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. त्यामुळे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळू शकलेले नाही. 

हेही वाचा -  स्मृती इराणी यांना पराभवानंतरही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार?

दरम्यान या घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य तो मान राखला जाईल. भविष्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यात नक्कीच संधी मिळेल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आम्ही कॅबिनेट मंत्रिपद मागितले होते हे सत्य आहे असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. थोडे दिवस थांबा, धीर ठेवा. काही दिवसांनी नक्कीच विचार होईल,अशी प्रतिक्रीया यानंतर प्रफुल पटेल यांनी सांगितले.