जाहिरात
This Article is From Jun 09, 2024

Modi 3.0 : तीन वेळा खासदार, वय अवघे 36, महाराष्ट्रातील एकमेव महिला नेता घेणार मंत्रिपदाची शपथ

येत्या काही तासात मोदी 3.0 च्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे, यावेळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

Modi 3.0 : तीन वेळा खासदार, वय अवघे 36, महाराष्ट्रातील एकमेव महिला नेता घेणार मंत्रिपदाची शपथ
रावेर:

येत्या काही तासात मोदी 3.0 च्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे, यावेळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्या मंत्रिमंडळात तीस मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.  

रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत. त्यांनी बीएससी कॉम्युटर सायन्सपर्यंतच शिक्षण घेतलं असून वयाच्या 36 व्या वर्षी त्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. 2010 पासून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली. 2010 ते  2012 या कालावधीत त्यांची कोथळी मुक्ताईनगर येथे सरपंच म्हणून निवड झाली. त्यानंतर 2012 ते 2014 मध्ये जिल्हा परिषद व सभापती, 16 वी लोकसभा 2014 to 2019 या कालावधीत रावेरच्या खासदार, 17 व्या लोकसभेत 2019 to 2024 मध्ये दुसऱ्यांना खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2024 च्या अठराव्या लोकसभेत रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांना निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. 

2013 मध्ये रक्षा खडसे यांचे पती निखिल खडसे यांचे अपघाती निधन झालं. यानंतर रक्षा खडसे यांनी पूर्णपणे जबाबदारी सांभाळली. रावेर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा  बालेकिल्ला मानला जातो. सतत तीन वेळा खासदार म्हणून रक्षा खडसे यांचा विजय झालेला आहे. साधी राहणी, स्पष्ट विचार, विकासाचे व्हिजन आणि आपल्या माणसांविषयी आपुलकी हीच रक्षा खडसे  यांची खरी ओळख. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज एका उंच टप्प्यावर येऊन ठेपला आहे.

रक्षा खडसे या 2010 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कोथळी (ता. मुक्ताईनगर) च्या त्या सरपंच होत्या. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. शिक्षण सभापती असताना त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. 2014 मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढविली व त्या खासदार झाल्या, त्यानंतर सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्या दुसऱ्यांदा याच मतदार संघातून खासदार झाल्या.

नक्की वाचा - मोदींच्या मंत्रिमंडळातील 'वजनदार' मंत्री नितीन गडकरी, तिसऱ्यांदा घेणार शपथ

रक्षा खडसे या दोन टर्म भाजपच्या खासदार आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. हिना गावित यांच्यासोबत रक्षा खडसे या 17 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते.

सासरे एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर रक्षा खडसे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्य सुरू ठेवले भारतीय जनता पक्षाची भूमिका त्या अत्यंत प्रखरतेने मांडतात.

एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मुलीनेही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणे पसंत केले होते. मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही, असे रक्षा खडसे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com