छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गात कोसळला. तो वाऱ्याने कोसळला असे सरकारने सांगितले. वाऱ्यांने मुख्यमंत्र्यांची दाढी हलत नाही. अजित पवारांचं जॅकेट हलत नाही. देवेंद्र फडणवीसांचं तर काहीच हलत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या गुर्मीत माफी मागितली. अजित पवारांनी माफी मागितली. पण देवेंद्र फडणवीसांनी माफी का मागितली नाही असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उफळण्याची दाट शक्यता आहे. अमरावतीच्या दर्यापूर मतदार संघात प्रचार सभे वेळी ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा असा सल्ला फडणवीसांनी ठाकरेंना दिली होता. त्यावर ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवली. मोदी एका बैठकीत ओडीसाच्या मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याची राजधानी विचारत होते. तसच फडणवीसांना मुंब्रा हे ठाणे जिल्ह्यात येतं हे माहित नाही का? त्याच ठाण्याचा मुख्यमंत्री आहे. त्यांना जर महाराजांचा पुतळा मु्ंब्र्यात बसवता येत नसेल तर तो आम्ही बसवू. गद्दारांना बसवण्याचा तो अधिकार नाही असे सणसणीत उत्तर ठाकरे यांनी दिलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाचा वचनमाना जाहीर; उद्धव ठाकरेंनी काय दिलीत आश्वासने?
शिवाय त्यांनी सिंधुदुर्गात राजकोट इथं कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय ही काढला. हा पुतळा कोसळला त्यावेळी पंतप्रधान मोदींनी ही माफी मागितली होती. शिवाय अजित पवारांनीही माफी मागितली. पण देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावेळी फडणवीसांनी माफी का मागितली नाही याचं उत्तर आधी द्यावं असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर उभे करण्याची घोषणा केली होती. त्यावर फडणवीसांनी त्यांना आधी मुंब्र्यात मंदीर उभे करून दाखवा असे आव्हान दिले होते. त्यावरू आता ठाकरे यांनी फडणवीस यांना चांगलचं घेरलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं
भाजपची घोषणा आहे बटेंगे तो कटेंगे... कोण काटेंगे तेच मी बघतो असे ठाकरे म्हणाले. भाजपचा अजेंडा हा महाराष्ट्र को लुटुंगे औरो दोस्तों को बाटेंगे असा आहे. पण आम्ही ना लुटने देंगे ना बाटने देंगे असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहीजे असे म्हणाले. नागपूरात मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबसचा प्राजेक्ट आणला होता. पण तो प्रोजेक्ट गुजरातला गेला. तो प्रोजेक्ट राहीला असता तर विदर्भातल्या तरूणांना नोकऱ्या भेटल्या असत्या. पण फडणवीसांना त्याचे काही पडले नाही. ज्या विदर्भामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याबद्दलही त्यांना काही वाटत नाही. त्याची फडणवीसांना लाज वाटली पाहीजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.