जाहिरात

पाडवा वेगळा झाला, भाऊबीज एकत्र होणार का ? अजित पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या

पाडवा वेगळा केला, भाऊबीज एकत्र होणार का? या प्रश्नाला अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

पाडवा वेगळा झाला,  भाऊबीज एकत्र होणार का ? अजित पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या
पुणे:

पवार कुटुंब पाडल्या निमित्त एकत्र येतं. ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आली आहे. मात्र या परंपरेत आता खंड पडला आहे. पक्षात फूट पडली. पण सणामध्येही फूट पडल्याचे दिसून आले. शरद पवार आणि अजित पवारांनी वेगवेगळा पाडवा साजरा केला. वेगळा पाडवा साजरा करण्या मागे काय भूमिका होती हे ही अजित पवारांनी स्पष्ट केले. पण पाडवा वेगळा केला, भाऊबीज एकत्र होणार का? या प्रश्नाला अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वेगळा पाडवा साजरा करण्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट पणे मांडली. ते म्हणाले पहिल्यापासून आजी-आजोबा असल्यापासून काटेवाडीतच पाडवा साजरा केला जायचा. इथेच लोकं भेटायला यायची. नंतरच्या काळात गोविंदबागेची जमीन घेतली गेली. घर बांधलं गेलं. त्यानंतर बारामतीच्या लोकांना जवळ पडावं यासाठी तिथे कार्यक्रम घेतला जाऊ लागला असे अजित पवारांनी सांगितले. शिवाय पाडव्याला भेटायला येणाऱ्यांची मोठी गर्दी होते. 

ट्रेंडिंग बातमी -  मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?

भेटीसाठी लोक तासनतास रांगेत उभे राहात. त्यांना रांगेत उभे राहायला लागू नये. जास्त गर्दी होऊ नये यासाठी पाडव्याची विभागणी करण्यात आली. ज्या लोकांना मला भेटायला यायचं होतं ते मला भेटण्यासाठी आले. ज्यांना शरद पवारांना भेटायचं होतं ते त्यांना भेटायला गेले असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. यामुळे गर्दीही कमी झाली. जर एकत्र पाडवा झाला असता तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असती. या सर्व लोकांना भेटण्यासाठी मग संध्याकाळचे सहा वाजले असते असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकांनाही पाडव्याला घरी जायचे असते. दोन पाडवे झाल्याने गर्दी विखूरली गेली. त्यामुळे लोकांचा वेळही वाचला, असे अजित पवार म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले

राज्यभरातून माणसं भेटायला आली होती. त्यांचा उत्साह पाहून आपल्यालाही हुरूप आल्याचे अजित पवारांनी सांगितले. राज्यात एक वेगळं वातावरण आहे. उगीच यायचं म्हणून कोणी भेटायला आले नव्हते. भेटायचे म्हणून भेटले असे झाले नाही. विविध वयोगटातील लोकं पाडव्याला भेटली. ही लोकं आणलेली नव्हती. लोकं स्वयंस्फुर्तीने आली होती. मी विचार करत होतो की भेटावे की नाही. पण मुलासह मला सगळ्यांनी सांगितलं की भेटाय पाहीजे. त्यानंतर  सकाळी 6 पासून लोकं यायला सुरूवात झाली. सगळ्यांना भेटण्याचा मी प्रयत्न केला असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.  

ट्रेंडिंग बातमी - "एकनाथ शिंदे संकुचित विचारांचे", मनसेची माहीमच्या जागेवरून टीका

पाडवा वेगळा झाला पण भाऊबीजेचे काय होणार? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर भाऊबीज ही एकत्रच होणार असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. भाऊबीजेला पवार कुटुंब एकत्र असेल असेच त्यांनी सुचित केले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाऊबीज होणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र खरोखर त्या दिवशी अजित पवार भाऊबीजेसाठी जातात की नाही याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले असेल.  दरम्यान महायुतीच्या प्रचाराला 6 तारखेपासून सुरूवात होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com