
कौन बनेगा करोडपती (KBC) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे संपूर्ण जगाला माहिती असलेलं एक घट्ट समीकरण आहे. अमिताभ बच्चन यांच्यामुळेच केबीसी लोकप्रियेतेच्या शिखरावर पोहोचला. अमिताभ बच्चन यांनी आजवर त्यांची प्रभावी भाषा, आदबशीर स्वभाव, वेगवेगळ्या विषांमधील ज्ञान आणि सुपपस्टार प्रतिमा याच्या जोरावर या शोची धुरा एकहाती सांभाळली होती. मात्र, आता या शोमध्ये मोठे बदल होणार असल्याची बातमी आहे. हा शो आता पूर्वीसारखा राहणार नाही, असं मानलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमिताभ बच्चन केबीसीचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांची जागा बारावी पास अभिनेता घेणार आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून सलमान खान (Salman Khan) आहे, जो 'बिग बॉस'नंतर आता 'केबीसी' होस्टची जबाबदारी पार पाडू शकतो.
होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. सलमान खान 'कोण बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जागी होस्ट बनण्याबाबत चर्चा सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, शोच्या निर्मात्यांना वाटते की छोट्या पडद्यावर सलमान खानची जबरदस्त पकड आहे. अमिताभ बच्चन यांची जागा कोणी घेऊ शकत असेल, तर तो सलमानच आहे, कारण त्यांचे कनेक्शन छोट्या शहरातील प्रेक्षकांशीही खूप मजबूत आहे.
( नक्की वाचा : Hera Pheri 3 : अक्षय कुमारनं परेश रावलला पाठवली 25 कोटींची नोटीस! 'या' कारणामुळे संतापला अभिनेता )
यापूर्वी शाहरुख खाननेही 'केबीसी' होस्ट केले आहे. परंतु निर्मात्यांना शाहरुख खानऐवजी सलमान खानला या शोचा होस्ट करण्याची इच्छा आहे. सर्व काही जुळून आले, तर लवकरच सलमान खान या शोमध्ये धमाकेदार एंट्री करू शकतो.
मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत दिसणार जलवा
सध्या या कार्यक्रमासंबंधी आर्थिक चर्चा सुरु आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चर्चेचा टप्पा लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर सलमान खान भारताच्या सर्वात मोठ्या क्विझ रिअॅलिटी शोचे होस्ट करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अमिताभ बच्चन यांना खासगी कारणांमुळे हा शो होस्ट करण्याची इच्छा नाही.
'केबीसी' व्यतिरिक्त, सलमान खान 'बिग बॉस'चा पुढील सीझनही होस्ट करणार आहे. तसेच जुलैपासून अपूर्वा लाखियाच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच, सलमान खानच्या चाहत्यांसाठी येणारा काळ खूप धमाकेदार असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world