Salman Khan House Firing Update : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या (Anmol Bishnoi) प्रत्यार्पणाच्या कारवाईस सुरुवात केली आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोई सध्या अमेरिकेमध्ये आहे. त्याला भारतामध्ये आणण्यासाठी मुंबई पोलीस अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विशेष महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) न्यायालयाने अनमोल बिश्नोईच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे आणि परदेशामध्ये त्याचा शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी केलीय. या व्यतिरिक्त अनमोलला भारतामध्ये आणण्यासाठी पोलिसांना न्यायालयाकडून काही कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: सलमान खानला पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी, मेसेजद्वारे 2 कोटी रुपयांची मागणी)
विशेष मकोका न्यायालयाने पोलिसांची विनंती कधी मान्य केली?
विशेष मकोका न्यायालयाने 16 ऑक्टोबरला मुंबई पोलिसांची अनमोल बिश्नोईसंदर्भातील (Anmol Bishnoi) विनंती मान्य केलीय. त्यामुळे आता न्यायालयाकडून लवकरच कागदपत्रे मिळतील, अशी आशा पोलिसांना आहे. न्यायालयाकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर कारवाईसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा आम्ही साधे झुरळही मारले नाही... धमकीसत्रादरम्यान वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया)
कोण आहे अनमोल बिश्नोई?
- अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) छोटा भाऊ आहे.
- अनमोल बिश्नोई देखील गुन्हेगारीच्या विश्वात सक्रिय आहे.
- अनमोल अमेरिका आणि कॅनडामधून त्यांची गँग चालवत असल्याचे म्हटले जाते.
- NIAने काही दिवसांपूर्वी अनमोल बिश्नोईवर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
- एप्रिल (2024) महिन्यामध्ये अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी NIA अनमोल बिश्नोईच्या मागावर आहे.
- अनमोल बिश्नोईच्या नावाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीतही समावेश करण्यात आला आहे.
(नक्की वाचा: ...तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, धमकीसत्र सुरूच)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world