Dharmendra Health Update : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेद्र यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता डॉक्टरांनी सांगितलं की, धर्मेंद्रच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या १२ नोव्हेंबर २०२५, बुधवारी सकाळी साधारण ७.३० वाजता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. (dharmendra suffering from which disease)
धर्मेंद्र यांच्यावर घरीच होणार उपचार
मीडियामध्ये आलेल्या वृत्तांनुसार, धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल आणि बॉबी देओलने कुटुंबाच्या इतर सदस्यांसोबत मिळून हा निर्णय घेतला. आता त्यांच्या वडिलांवर घरातच उपचार दिले जातील.
धर्मेंद्र यांची प्रकृती कशी बिघडली...
मीडियामध्ये आलेल्या वृत्तांनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. त्यांना श्वास घ्यायला अडचण जाणवत होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी अभिनेत्याच्या निधनाची अफवाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल आणि हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि अशा अफवा बंद करण्याचं लोकांना आवाहन केलं.
नक्की वाचा - Dharmendra : धर्मेंद्रचा एकही रुपया हेमा मालिनीला मिळणार नाही? ४५० कोटींपैकी कोणाला सर्वाधिक भाग, कायदा काय सांगतो?
धर्मेंद्र यांना श्वास घ्यायला त्रास...
ब्रीच कँडी रुग्णालयाकडून सांगितल्यानुसार, ८९ वर्षांचे धर्मेंद्र यांना श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं होतं.
रुग्णालयाकडून सांगितलं की, वयानुसार असा त्रास होणं सामान्य आहे. धर्मेंद्र यांना फुप्फुसांचा त्रास होता. अशात त्यांना गेल्या काही कालावधीपासून श्वास घ्यायला त्रास होत होता. वैद्यकीय भाषेत याला डिस्पनिया म्हटलं जातं.
डिस्पनिया (Dyspnea) म्हणजे काय?
सर्वसाधारणपणे वय वाढतं त्यासह लोकांमध्ये श्वासासंबंधित त्रास वाढू लागतात. श्वास घ्यायला त्रास होण्याच्या आजाराला डिस्पनिया (Dyspnea) किंवा Shortness Of Breath (शॉर्टनेस ऑफ ब्रेथ) म्हटलं जातं. हे एक लक्षण आहे. ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा किंवा विविध आजारांचे संकेत असू शकतात.
हृदय आणि फुप्फुसांचे आजार डिस्पनियाचं सामान्य कारण आहे. डिस्पनिया याला सर्वसाधारण भाषेत श्वास गुदमरणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. हा हृदय किंवा फुप्फुसांच्या समस्यांची लक्षणं आहेत. मात्र हे अस्थमा, न्यूमोनिया, अॅनिमिया, चिंता किंवा शारिरीक परिश्रमामुळेही होऊ शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
