जाहिरात
This Article is From Apr 15, 2024

धोनीच्या आयुष्यावरील आणखी एक Untold Story, नव्या सिनेमाचं पोस्टर पाहिलंत का?

धोनीच्या आयुष्यावरील आणखी एक Untold Story, नव्या सिनेमाचं पोस्टर पाहिलंत का?
महेंद्रसिंह धोनी (फाईल फोट @Twitter)
मुंबई:

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 42 वर्षांच्या धोनीचा खेळ प्रत्यक्ष पाहण्यासाठी लाखो फॅन्स आजही मैदानात गर्दी करतात. त्याचबरोबर धोनीच्या खासगी आयुष्याबाबतही अनेकांना उत्सुकता असते. जाहीर कार्यक्रमात फारसा सहभागी न होणारा, सोशल मीडियावर सक्रीय नसलेल्या धोनीचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखं आहे.

धोनीच्या आयुष्यातील अनोळखी पैलू दाखवणारा  MS Dhoni : The Untold Story हा सिनेमा सुपर हिट झाला होता. सुशांत सिंह राजपूतनं या सिनेमात धोनीची भूमिका केली होती.  त्यानंतर 8 वर्षांनी धोनीवरील आणखी एक सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr.& Mrs. Mahi) असं या सिनेमाचं नाव आहे. राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख रविवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी 15 एप्रिल रोजी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्यामध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसतायत.  राजकुमारनं महेंद्र तर जान्हवीनं महिमा नावाची निळी जर्सी घातलीय. ते दोघंही स्टेडियममध्ये उभे राहून भारतीय क्रिकेट टीमला चियर्स करत आहेत. 

लक्षवेधी टॅगलाईन

या पोस्टरमध्ये दोघांचे चेहरे दिसत नाहीत. पण, त्यावरी टॅगलाईन ही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 'तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी आई-वडिलांना खोटं बोलण्याची गरज नाही... या जगा!' त्याचबरोबर करण जोहरनं आणखी एक कॅप्शन दिलंय. त्यामध्ये 'तुमचं स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे. आता संपूर्ण मैदान तुमचं आहे.'

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाच्या निमित्तानं राजकुमार राव आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. त्यांनी यापूर्वी 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रुही' या हॉरर सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.  

धोनी, शास्त्री आणि वानखेडे! पुन्हा जागा झाला 13 वर्षांपूर्वीचा इतिहास, Video
 

करण जोहर, झी स्टुडिओज, हीरु यश जोहर आणि अपूर्व मेहता हे या सिनेमाचे निर्माते असून शरण शर्मा हे दिग्दर्शक आहेत. 31 मे 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com