सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, मोठा खुलासा, आणखी एक संशयित ताब्यात!

जाहिरात
Read Time: 3 mins
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, मोठा खुलासा, आणखी एक संशयित ताब्यात!
मुंबई:

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी हरियाणातील एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्या संशयिताची चौकशी करत आहेत. दोन्ही गोळीबार करणारे आरोपी घटनेपूर्वी आणि नंतर संशयिताच्या संपर्कात होते, असा संशय पोलिसांनी तपासात व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेला संशयीत व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई गॅंग आणि शूटर्समध्ये संपर्क साधून देत होता. पोलीस आता या गुन्ह्यात त्याच्या भूमिकेचा तपास करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित व्यक्तीचा दोन अटक आरोपींपैकी एकाशी संबंधित आहे आणि ते घटनेपूर्वी आणि नंतर सतत संपर्कात होते.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे बिष्णोई गँगशी संबंध !

अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेला व्यक्ती गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईच्या सूचनेनुसार काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर अनमोल बिश्नोईने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांच्या हालचालींची तपशीलवार माहिती संशयात व्यक्ती अनमोल बिश्नोई पर्यंत पोहोचवत ​​होता आणि इंटरनेटचा वापर करुन कॉल करत होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या काही तास आधी शूटर सागर पाल याला पिस्तूल पुरवण्यात आली होती, 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे परिसरातून आरोपीला पिस्तूल पुरवण्यात आली होती. मात्र, पिस्तूल पुरवठा करणारी व्यक्ती कोण होती, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना पैसे पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

पोलिस सूत्रानुसार, दोन्ही आरोपींना चार लाख रुपये देण्यात आले होते. सुरुवातीला एक लाख रुपये दिले होते, उर्वरित तीन लाख रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारात हरियाणातून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची काय भूमिका होती, याचा तपास सुरू आहे.

Advertisement

14 एप्रिल रविवारी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. मात्र, गोळीबार करणारे शूटर आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. ही घटना घडवत असताना दोन्ही गोळीबार करणाऱ्यांनी सीसीटीव्हीमध्ये त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचे चेहरे लपवले होते. दोघांनीही हेल्मेट आणि टोप्या घातल्या होत्या, त्यामुळे त्यांचे चेहरे जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मात्र, त्यांनी आपली मोटारसायकल माऊंट मेरी चर्चजवळ सोडली होता. दोन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना आधार कार्डची मोठी मदत झाली.

अशा प्रकारे दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले दोन्ही आरोपींनी त्यांचे मोबाईलही सोबत ठेवले होते. अशा स्थितीत सीसीटीव्ही आणि मोबाईल फोन डिटेल्सच्या मदतीने पोलिसांना एक नंबर कळला ज्यावरून अनेक वेळा कॉल्स आले होते, त्या नंबरच्या मदतीने पोलिसांचे काम सोपे झाले नंबरचे लोकेशनमुळे पोलिसांनी 36 तासांतच दोघांना पकडले.

Advertisement