जाहिरात
Story ProgressBack

IPL मॅचमध्ये श्रद्धा कपूरच्या डुप्लिकेटवर खिळल्या सर्वांच्या नजरा, व्हायरल फोटोवर अभिनेत्री म्हणाली, 'अरे ही तर...'

IPL 2024: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमधील आयपीएल सामन्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरप्रमाणेच हुबेहूब दिसणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read Time: 2 min
IPL मॅचमध्ये श्रद्धा कपूरच्या डुप्लिकेटवर खिळल्या सर्वांच्या नजरा, व्हायरल फोटोवर अभिनेत्री म्हणाली, 'अरे ही तर...'
IPL 2024: श्रद्धा कपूरने दिली गंमतीशीर प्रतिक्रिया

IPL 2024:  इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2024चे सामने पाहण्यासाठी केवळ चाहतेमंडळीच नव्हे तर सेलिब्रिटी देखील मैदानामध्ये आवर्जून हजेरी लावतात. सध्या सोशल मीडियावर खेळाच्या मैदानावरील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जरी मैदानावरील असला तरी चर्चा तुमच्या आवडत्या खेळाडूची नाहीय, बरं का! तर यामध्ये बॉलिवूडमधील (Bollywood News) क्युट अभिनेत्री श्रद्धा कपूरप्रमाणे (Shraddha Kapoor) दिसणाऱ्या एका सौंदर्यवतीची झलक पाहून युजर्सच्या काळजाचा ठोका चुकत आहे. सोशल मीडियावर या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या तरुणीचे दिसणे आणि हसणे हुबेहूब श्रद्धा कपूरप्रमाणेच आहे.  

आपल्यासारख्याच सेम-टू-सेम दिसणाऱ्या तरुणीचे व्हायरल व्हिडीओ आणि फोटो पाहून यावर खुद्द श्रद्धा कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नव्हे तर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी सुद्धा शेअर केली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान कॅमेरामनने आपला कॅमेरा प्रेक्षकांच्या दिशेने वळवला आणि एका तरुणीवर फोकस केला. कॅमेऱ्यामध्ये अगदी श्रद्धा कपूरसारखीच दिसणाऱ्या तरुणीची झलक कैद झाली.  

यानंतर सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ आणि बातमी व्हायरल होताच श्रद्धा कपूरनेही व्हिडीओचे स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये शेअर केले आणि "अरे ही मीच तर आहे..." असे गंमतीशीर कॅप्शनही दिले.  स्टोरीमध्ये "मै हूं ना" सिनेमाचे टायटल ट्रॅक देखील ऐकू येत होते. 


रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखीच दिसणाऱ्या या मुलीचे नाव प्रगती नागपाल असे आहे. जी सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय आहे आणि तिचे 166K फॉलोअर्स देखील आहेत.

आणखी वाचा

गोळीबाराच्या वेळेस सलमान खान घरातच होता, लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

30 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याची लेक दिसते इतकी सुंदर, लुकवर चाहते फिदा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination