
अभिनेत्री अनुष्का शर्माला वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या चाहत्यांसोबतच चित्रपट जगतातील अनेक कलाकारांनी खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काचा पती आणि क्रिकेटपटू विराट कोहलीने ही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा इतरां पेक्षा खास आहेत. अनुष्काच आपलं सर्वस्व असल्याचे त्याने सांगितले आहे. अनुष्का शर्मासोबत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझी जीवनसाथी, तू माझी सर्व काही आहेस. तू आम्हा सर्वांना मार्गदर्शन करते. आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह.” ही पोस्ट सध्या जोरदार व्हारयल होत आहे. या माध्यमातून विराटने लग्नाच्या 8 वर्षानंतर पुन्हा एकदा अनुष्काला तिच्याबाबतचे प्रेम व्यक्त केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये इटलीत लग्न केले. त्यांच्या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. अनुष्का शर्माने 2021 मध्ये एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव त्यांनी वामिका ठेवलं आहे. यानंतर तीन वर्षांनी त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्याची माहिती अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर दिली होती. विराट-अनुष्काने आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या मुलाचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यानंतर दोघेही भारत सोडून विदेशात स्थायिक होऊ शकतात, अशा बातम्या येत होत्या.
अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत ‘झीरो' या चित्रपटात दिसली होती. 2018 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं होतं. ‘झीरो'मध्ये अनुष्का शर्मासोबत अभय देओल, आर. माधवन आणि मोहम्मद जीशान आयूब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात शर्मा यांनी सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या एका वैज्ञानिकाची भूमिका साकारली होती.
ट्रेंडिंग बातमी - Big News: महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? थांबा! त्या आधी ही बातमी नक्की वाचा
अनुष्काच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ‘चकदा एक्सप्रेस' हा बायोपिक आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री भारतीय क्रिकेटपटू झूलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. प्रोसित रॉय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या स्पोर्ट्स ड्रामाचा टीझर जानेवारी 2022 मध्ये समोर आला होता. अनुष्काने तिच्या अधिकृत एक्स अकाउंटवर टीझर शेअर करत लिहिले, “हा खरंच एक खास चित्रपट आहे कारण ही एक अविश्वसनीय कथा आहे.” ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही सिंडिकेट फीडवरून थेट प्रकाशित करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world