जाहिरात

गूगल मॅपने केला घात; कार अर्धवट पुलावरुन कोसळली, तिघांचा मृत्यू

अपघात झाला त्यावेळी कार पूर्णपणे जीपीएसवर अवलंबून धावत होती. त्यामुले पुलाचे काम अपूर्ण असल्याने कार चालकाला कळालेच नाही.

गूगल मॅपने केला घात; कार अर्धवट पुलावरुन कोसळली, तिघांचा मृत्यू

प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठी गूगल मॅपचा वापर करणे सामान्य बाब झाली आहे. गूगल मॅप रस्ता शोधण्याचा सोपा पर्याय आहेत. मात्र गूगल मॅपचा वापर करुन रस्ता शोधणे तिघांच्या जीवावर बेतलं आहेत. गूगल मॅपने दाखवलेल्या मार्गावर जात अर्धवट पुलावरुन कार कोसळल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, फरिदपूर, बरेली येथील खालपूर भागात ही घटना घडली आहे. दुर्घटनाग्रस्त कार गूगल मॅपद्वारे दाखवलेल्या मार्गावर धावत होती. मात्र कार अचानक पुलावरून खाली पडल्याने दोन भावांसह तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

अपघात झाला त्यावेळी कार पूर्णपणे जीपीएसवर अवलंबून धावत होती. त्यामुले पुलाचे काम अपूर्ण असल्याने कार चालकाला कळालेच नाही. निष्काळजीपणामुळे तिघांचा बळी गेला आहे. याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागणार असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 

(नक्की वाचा-  लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं)

सर्वजण लोक गावात एका लग्नाला येत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेळीच बॅरिकेडिंग केले असते तर या लोकांना जीव वाचवता आला असता. 

गूगल मॅप वापरताना काळजी घ्यावी

गुगल मॅप हे अतिशय फायदेशीर टूल आहे. मात्र त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे नेहमीच योग्य नसते. गुगल मॅप नेहमीच अपडेट केला जातो, परंतु काही वेळा त्यात चुका होऊ शकतात. यामुळे विशेषतः लहान रस्ते किंवा नव्याने बांधलेल्या भागात समस्या निर्माण होतात. Google Map नेहमीच अचूक नसते. 

(नक्की वाचा-  विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं)

विशेषत: अचानक जाम किंवा अपघात झाल्यास ते फारसे अचूक नसते. काहीवेळा गुगल मॅपमध्ये अपूर्ण पूल किंवा धोकादायक रस्तेही दाखवले जाऊ शकतात. म्हणून, नेहमी सावध रहा आणि आपल्या सभोवतालच्या परिसराची आणि रस्त्यांची काळजी घ्या. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com