जाहिरात

साहित्य संमेलनात दिसली PM मोदी - पवारांची केमेस्ट्री, स्टेजवरील प्रसंगाची सर्वत्र चर्चा, पाहा Video

PM Modi and Sharad Pawar : साहित्य संमेलनाचं उद्घाटन करत असतानाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात पकडला होता.

साहित्य संमेलनात दिसली PM मोदी - पवारांची केमेस्ट्री, स्टेजवरील प्रसंगाची सर्वत्र चर्चा, पाहा Video
नवी दिल्ली:

PM Modi and Sharad Pawar :नवी दिल्लीत आजपासून (शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025) 98 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. शरद पवार (Sharad Pawar) या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तीन दिग्गज नेते एकाच स्टेजवर उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

PM मोदी आणि शरद पवारांची केमेस्ट्री

साहित्य संमेलनाचं उद्घाटन करत असतानाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात पकडला होता. त्यानंतर दोघांनी मिळून दीपप्रज्वलन केले. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी स्टेजवर एकमेकांच्या जवळ बसले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी पवारांच्या समोरील पाण्याचा ग्लास स्वत: भरला. इतकंच नाही तर पवारांचं भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदी उभे राहिले होते. त्यांनी पवारांना बसण्यासाठी खुर्ची देखील सरकावली. 

शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. त्यांनी केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असं पवार यावेळी म्हणाले.

( नक्की वाचा : 'माझ्या मराठीचं RSS शी कनेक्शन', साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना PM मोदींनी सांगितलं गुपित )

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी आपण यावं हा प्रस्ताव घेऊन मी पंतप्रधानांकडं गेलो होतो. त्यावेळी त्यांनी एका मिनिटामध्येच कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं, असंही पवारांनी भाषणात सांगितलं.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक भाषा किंवा राज्यापुरते मर्यादीत नाही. मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यलढ्याचा सुंगध आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. ग्यानबा-तुकारामांच्या मराठीला राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी भाषणात सांगितलं. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा त्यांनी या भाषणात गौरवानं उल्लेख केला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: