जाहिरात

अदाणी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा; 69 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

दीक्षांत समारंभात एमबीए (इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट), एमबीए (एनर्जी मॅनेजमेंट) आणि एमटेक (कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट) प्रोग्रामच्या 69 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच 4 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

अदाणी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा; 69 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
अहमदाबाद:

अदाणी विद्यापीठाचा (Adani University) पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी, 5 ऑक्टोबर रोजी शांतीग्राम कॅम्पसमध्ये झाला. जगातील अग्रगण्य पर्यावरण शिक्षकांपैकी एक पद्मश्री कार्तिकेय विक्रम साराभाई यांनी दीक्षांत समारंभात भाषण केले. कार्तिकेय विक्रम साराभाई हे सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशनचे (CEE) संस्थापक आणि संचालक देखील आहेत. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी अदाणी विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी होत्या.

दीक्षांत समारंभात एमबीए (इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट), एमबीए (एनर्जी मॅनेजमेंट) आणि एमटेक (कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट) प्रोग्रामच्या 69 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच 4 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. दीक्षांत समारंभाला नियामक मंडळ, व्यवस्थापन मंडळ, शैक्षणिक परिषद, स्टडी बोर्डाचे सदस्य आणि कॉर्पोरेट्समधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे कार्तिकेय साराभाई यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटलं की, तुम्ही नवीन अध्यायाची सुरुवात कराल, तेव्हा तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांचा आणि त्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विचार करा."

Latest and Breaking News on NDTV

अदाणी विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल वरिष्ठ नेतृत्व, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाला 2022 मध्ये औपचारिक मान्यता मिळाली.

प्रीती अदाणी यांनी म्हटलं की, "शिक्षणात अतुलनीय तेज आहे. अपयश तुम्हाला अधिक प्रगतीच्या मार्गावर नेण्यास मदत करते. अदाणी विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत आणण्याचे माझे ध्येय आहे. विद्यार्थ्यांनी अपयशाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

Latest and Breaking News on NDTV

 

प्रीती अदाणी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेच्या अनुषंगाने लाईफ सायन्समध्ये रिसर्च आणि इनोव्हेशन यावर लक्ष केंद्रीत करून नवीन भारताला आकार देण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. प्रीती अदाणी यांनी पुढे बोलताना, तरुणांना जगातील बदल आणि आव्हाने स्वीकारण्याचे आवाहन केले. ज्ञान, दृढता, तर्कसंगतता आणि बुद्धिमत्तेतील उत्कृष्टता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करेल.

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
HIBOX App Scam: अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अडचण वाढणार? 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची नोटीस
अदाणी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा; 69 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
haryana-assembly-elections-exit-polls-predict-clear-majority-for-congress-details
Next Article
Haryana Exit Poll Result : हरयाणामध्ये काँग्रेसचं पुनरागमन, एक्झिट पोलमध्ये बंपर बहुमत