जाहिरात

AdvantageAssam2: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली जीत अदाणी यांची भेट

अदाणी समूह आसाममध्ये तब्बल 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

AdvantageAssam2: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली जीत अदाणी यांची भेट

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी आज अदाणी समूहाचे संचालक जीत अदाणी यांची भेट घेतली. अदाणी समूह आसाममध्ये तब्बल 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी जीत अदाणी यांची भेट घेतली. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे. शिवाय त्यांनी अदाणी समूहाचे आभार ही या निमित्ताने मानले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री शर्मा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अदानी समूहाने 50,000 कोटींची गुंतवणुक करण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर आज माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अदाणी समूहाचे संचालक जीत अदानी आणि त्यांच्या टीमसोबत बैठक झाली. आम्हाला अपेक्षा आहे की एरो-सिटी, हॉटेल्स, रस्ते प्रकल्प आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी केलेले सामंजस्य करार लवकरच कार्यान्वित होतील. आमचे सरकार राज्याच्या लोकांसाठी 24/7 काम करते. या महत्त्वाच्या बैठकीसाठी जीत अदाणी यांच्या टीमने आम्हाला रविवारीही वेळ दिला, याबद्दल मी आभारी आहे. असं मुख्यमंत्री या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO News: सिडकोची परत एक मुदत वाढ, माझे पसंतीचे घर योजनेत नवा ट्वीस्ट

24 फेब्रुवारीला MP Global Investors Summit 2025 मध्ये अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी मध्य प्रदेशात 1.10 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर Advantage Assam 2.0 Summit 2025 मध्ये गौतम अदाणींनी मोठी घोषणा केली होती. त्यानुसार अदाणी समूह आसाममध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक विमानतळ, सिटी गॅस, रस्ते, हवाई या क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शर्मा ही भेट घेतली.  

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा

अदाणी समूह आसाममध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक विमानतळ, सिटी गॅस, रस्ते, हवाई या क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचा थेट फायदा आसामच्या जनतेला होणार आहे. शिवाय आसामच्या विकसात हातभारही लागणार आहे. या गुंतवणूकीचे प्रकल्प लवकर सुरू होतील असा विश्वास या भेटी वेळी मुख्यमंत्री शर्मा यांनी व्यक्त केला आहे. अदाणी समूहा मार्फत केल्या जाणाऱ्या या गुंतवणुकीमुळे आसामचा चेहरामोहरा बदलणार आहे.