आज अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त ठिकठिकाणी गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे आज राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार असून शेतकरी कर्जमाफी आणि आणखी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता आहे.
Live Update : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकीय अजेंड्याच्या विरोधात एनएसयूआयचे आंदोलन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकीय अजेंड्याच्या विरोधात एन एस यू आयचे आंदोलन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वक्तृत्व स्पर्धेसाठी "Voice of Devendra" हा विषय ठेवला असून,हा उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे.
शिक्षण संस्थांना राजकारणाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न आम्ही कधीच सहन करणार नाही.
याला विरोध म्हणून एन एस यू आय आणि समविचारी विद्यार्थी संघटना यांचे आंदोलन
विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना ऑफिस समोर करणार आंदोलन
शिक्षण वाचवा विद्यापीठ वाचवा लोकशाही वाचवा
Live Update : गडचिरोलीत डेंग्युचे तब्बल 81 रुग्ण
मुलचेरा तालुक्यातील आणि विशेषत: लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून तापाने थैमान घातले आहे. यात काल एका महिलेचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाल्याने आठवडाभरात मृतांची संख्या तीन झाली आहे तसेच येल्ला या एकाच गावात डेंग्यूची चाचणी मध्ये तब्बल 81 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे आपल्या चमू सह तळ ठोकून आहेत
Live Update : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना जोरदार पावसाचा फटका
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना जोरदार पावसाचा फटका
- बक्शी हिप्परगा गावाला रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी..
- बक्शी हिप्परगा गावातून जाणाऱ्या ओढ्याची पाणी पातळी वाढली, ओढ्याच्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ
- बोरामणी येथून ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान
- सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक खरीपांच्या पिकांना नैसर्गिक संकट
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक शेती पिकांना फटका बसल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी..
Live Update : सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्कारानंतर राणी मुखर्जीने शिर्डीत साईबाबांचं घेतलं दर्शन
'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या नंतर तीनं शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेवून बाबांचे धन्यवाद मानले.. 2023 मधील मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी यश मिळावं म्हणून देखिल राणी मुखर्जीन शिर्डीत
येवून साकडं घातलं होत.. आता तिच्या कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं तीन भक्तीमय वातावरणात साईंच दर्शन घेत धन्यवाद मानलेय..
राणी मुखर्जीने तिच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 44 पुरस्कार जिंकले असून हे सर्व यश साईंच्या आशीर्वादान मिळाल्याच राणीनं साई दर्शनानंतर म्हटलय
Live Update : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूशखबर, 14 हजार पोलिसांची भरती होणार; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब
महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूशखबर, 14 हजार पोलिसांची भरती होणार; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब
Live Update : राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर...
राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 12, 2025
प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात येत आहे
1. Vidyatai chavan
2. Ankush Kakade
3. Sudhakar Bhalerao
4. Bhimroa Hattiambere
5. Mahesh Tapase
6. Vikas Lawande
7. Sakshana Salgar
8. Mehbub Shaikh
9. Fahad Ahmed
10. Raja Rajpurkar…
Live Update : अक्कलकोट तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग
अक्कलकोट तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग
अक्कलकोट तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोरगाव देशमुख पुलावरून पाणी लागले वाहू
पुलावरून पाणी वाहत असल्याने घोळसगाव,बोरगाव, वागदरी गावांचा संपर्क तुटला
दरम्यान,या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून तूर,उडीद आणि सोयाबीन पिकांचे होतय मोठ्या प्रमाणात नुकसान
Live Update : मलबार हिल परिसरात झालेल्या अपघाताची फॉरेन्सिक तपासणी करण्यास सुरुवात
मलबार हिल परिसरात झालेल्या अपघाताची फॉरेन्सिक तपासणी करण्यास सुरुवात
मुंबई पोलिसांचा फॉरेनची पथक घटनास्थळी दाखल
या अपघातात नीता शहा या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता
बेस्ट बस आणि स्कोडा कार यामध्ये चिरडून मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला
Live Update : मलबार हिल परिसरात झालेल्या अपघाताची फॉरेन्सिक तपासणी करण्यास सुरुवात
मलबार हिल परिसरात झालेल्या अपघाताची फॉरेन्सिक तपासणी करण्यास सुरुवात
मुंबई पोलिसांचा फॉरेनची पथक घटनास्थळी दाखल
या अपघातात नीता शहा या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता
बेस्ट बस आणि स्कोडा कार यामध्ये चिरडून मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला
Live Update : मनसेचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पोहोचलं...
मनसेचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पोहोचलं...
Live Update : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर, पोलीस भरती संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय
महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर, पोलीस भरती संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय
14000 पदांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणार मंजुरी
थोड्याच वेळात पोलीसभरती संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी तरुणांची प्रतिक्षा
Live Update : फहाद अहमद, नितीश देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक
फहाद अहमद, नितीश देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक
Live Update : आज पुन्हा नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची एकत्रित बैठक
आज पुन्हा नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची एकत्रित बैठक
* दुपारी साडेबारा वाजता मनसेच्या राजगड कार्यालयात बैठकीच आयोजन
* दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयात झाली होती बैठक
* दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहरात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाच्या नियोजनाबाबत होणार चर्चा
* मोर्चाची तारीख आणि वेळ ठरण्याची शक्यता
Live Update : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक पोलिसांची महत्वपूर्ण बैठक
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक पोलिसांची महत्वपूर्ण बैठक
- दुपारी 4 वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात बैठक
- पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, ढोल पथकाचे अध्यक्ष, शांतता समिती सदस्य राहणार उपस्थित
Live Update : श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची आज संवर्धन प्रक्रिया, दिवसभर देवीचं दर्शन राहणार बंद
श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची आज संवर्धन प्रक्रिया, दिवसभर देवीचं दर्शन बंद राहणार
नवी दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञांचे पथक करणार ही प्रक्रिया
आज दिवसभर देवीचं दर्शन बंद राहणार
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया आज सुरु होईल. नवी दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञांचे पथक रात्री साडेआठ वाजता कोल्हापुरात दाखल झाले. रात्री उशिरा समिती सदस्यांनी मूर्तीची पाहणी केली. सोमवारपासून संवर्धन प्रक्रियेसाठी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देवीचं दर्शन पूर्ववत होईल.
Live Update : मुंबई सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात, मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेचा मृत्यू
मुंबई सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात, मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेचा मृत्यू
- बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक बसली
- बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू
- ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती
- महिलेला जे जे रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती
Live Update : अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव श्री महागणपती मंदिरात भाविकांची गर्दी
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव श्री महागणपती मंदिरात भाविकांची गर्दी
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्री महागणपतींचा महाभिषेक करून मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्थानिक शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच अनेक भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मंदिर गाभारा व परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला.
Live Update : अकोल्यात 12 हजार 857 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 9 कोटींचे वाटप..
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी पहिल्याच दिवशी १२ हजार ८५७ शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप आणि रब्बी हंगाम २०२४ साठी ९.४ कोटी रुपये जमा करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
Live Update : गडचिरोलीच्या मनीषा मडावी ‘सक्षम आदिवासी महिला’ पुरस्काराने सन्मानित.....
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोलीच्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी यांना ‘सक्षम आदिवासी महिला’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित ‘विरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण सक्षमीकरण मेळाव्या’त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनीषा मडावी यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये मिस इंडिया २०२१, मिसेस महाराष्ट्र २०२२, सुपर मॉडेल रवी वॉक टायटल ऑफ इंडिया २०२२, फिनिक्स पुरस्कार २०२३, आदिवासी महिला नवरत्न पुरस्कार, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण पुरस्कार, गडचिरोली गौरव पुरस्कार २०२१ आणि आदिवासी समाज भूषण पुरस्कार २०२२ यांचा समावेश आहे. त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या कर्तृत्वाने हे यश मिळवले आहे
Live Update : ट्रक आणि मोटारसायकलच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू
ट्रक आणि मोटारसायकलच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू
नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत धामणा शिवारात ट्रक व मोटारसायकल ची जबर धडक होऊन दुचाकी स्वार रामेश्वर गावंडे, 30 वर्ष जागीच ठार झाला.
सोमवार दुपारी वेदांता धाब्याजवळ ट्रक नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी यु टर्न घेत असतांना मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकी स्वराचा यात मृत्यू झाला.
Live Update : नागपूरच्या 12 अल्पसंख्यांक समुदायातील नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा..
नागपूरच्या 12 अल्पसंख्यांक समुदायातील नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा..
* सर्व विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती मंजूर, अल्पसंख्यांक आयोगाच्या हस्तक्षेप आणि प्रयत्नामुळे 52 लाखापासून एक कोटी रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर ..
* या सर्व विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न येथे प्रवेश मिळाला आहे..
* हे विद्यार्थी सायबर सिक्युरिटी, कॉम्प्युटर सायन्स ,आंतरराष्ट्रीय व्यवसाय ,मास्टर ऑफ कॉमर्स आणि डेटा सायन्स अशा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहे..
* शिष्यवृत्ती मंजूर झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी प्यारे खान यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले...यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रदेशात शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..
Live Update : नोकरीसाठी आमदाराच्या नावाचा गैरवापर करत साडेचार लाखांची फसवणूक, आमदार संदीप जोशींकडून पोलिसांत तक्रार
नोकरीसाठी आमदाराच्या नावाचा गैरवापर करत साडेचार लाखांची फसवणूक, आमदार संदीप जोशींकडून पोलिसांत तक्रार
- आमदारांशी आपली ओळख आहे.त्यामाध्यमातून तुमच्या पत्नीला नोकरी लावून देतो असे म्हणत साडेचार लाखाने फसवणूक फसवणूक करण्यात आली आहे...फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने थेट आमदार संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली...
- आमदार जोशी यांनी दखल घेत पोलिसांच्या गुन्हेशाखेला पत्र पाठवून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली.
- निलेश खोडतकर अस तक्रार कर्त्याचे नाव तर अभय घोडवैद्य असे आमदाराच्या नावाने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव..
Live Update : पावसाळा निम्म्यावर आला तरी वर्धा जिल्ह्यातील महत्वाची धरणं अर्ध्यावरच
पावसाळा निम्म्यावर आला तरी वर्धा जिल्ह्यातील महत्वाची धरणं अर्ध्यावरच
निम्न वर्धा धरण भरले फक्त 67.80% टक्केच,धरणाला पावसाची प्रतीक्षा
धरणाचा जिवंत पाणीसाठा आहे फक्त 147.03 दशलक्ष घनमीटर
तर एकूण पाणीसाठा आहे 282.60 दशलक्ष घनमीटर
Live Update : दादर सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त जय्यत तयारी
दादर सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त जय्यत तयारी
अंगारकी संकष्टी निमित्त मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी
श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आल्यामुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
२१ वर्षानंतर असा योग जुळून आल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहे
महिला, पुरुष, वृद्ध, गरोदर महिला आणि अपंग या सर्वांसाठी विशेष रांगा आणि नियोजन यंदा मंदिर प्रशासनाने केले आहे
Live Update : भिवंडीत भाजपा नेत्यासह दोघांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
भिवंडीत दोघांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे.
भिवंडीत तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथील घटना.
प्रफुल्ल तांगडी दोन सहकाऱ्यां सोबत जे डी टी इंटरप्रायसेस या आपल्या कार्यालयात बसला असता.रात्री 11
वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी हल्ला केला.
प्रफुल्ल तांगडी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.
एक वर्षा पूर्वी प्रफुल्ल तांगडी यावर हल्ला झाला होता.
चार ते पाच हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती
Live Update : गाडेगावमध्ये आस नदीत व्यक्ती बुडाला, ४ तासाच्या शोधमोहिमेअंती नदीतून मृतदेह काढला बाहेर
अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव शिवारात 52 वर्षीय संजय सदाशिव वानखडे हे आस नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर आपत्कालीन पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. सलग चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले. तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी गणेश डोंगरे, देवनंद डाबेराव आणि शोधपथकातील सदानंद नान्ने, रामभाऊ भानगे, राजेश अमझरे, विजय तायडे, गोपाल पारीसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे.
Live Update : वाशीममध्ये भटक्यांच्या पालावरही अभिमानाने फडकला भारतीय तिरंगा, देशभक्तीचा अनोखा संदेश
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वाशीम शहरातील भटक्या कुटुंबांनीही देशभक्तीचे अनोखे उदाहरण घालून दिले. शहराच्या उपनगरात तात्पुरत्या झोपड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या या भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या पालावर अभिमानाने तिरंगा फडकवला. सुविधांपासून व विकासापासून दूर असतानाही त्यांनी आम्ही देशासोबत आहोत हा ठाम संदेश दिला. तिरंग्यामुळे त्यांच्या साध्या निवाऱ्यालाही एक वेगळी शोभा प्राप्त झाली. भटक्या कुटुंबातील वयोवृद्धांनी लहान मुलांना तिरंग्याचा अर्थ, बलिदानाची गाथा आणि देशभक्तीचे महत्त्व समजावून सांगितले. देशप्रेमाची ही भावना पाहून परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिरंग्याचा मान राखणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
Live Update : जळगावात वादातून तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावर खुर्द गावातील तरुणाला कॅफेमध्ये काही तरुणांसोबत झालेल्या वादातून मारहाण
मारहाणी नंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
सुलेमान पठाण असे मारहाणीत झालेल्या तरुणाचे नाव