- बिहार के औरंगाबाद में चाचा ने तीन भतीजे-भतीजी को कटर से काटकर उनकी हत्या कर दी
- आरोपी चाचा अमंत पाल ने दरवाजा खोलने में देरी के बाद गुस्से में आकर यह क्रूर कांड अंजाम दिया है
- घटना के बाद आरोपी ने खुद भी गला काटकर आत्महत्या की कोशिश की, हालत गंभीर होने पर पटना रेफर किया गया है
बिहारच्या औरंगाबादमध्ये एका सनकी काकाने दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून आपल्या तीन पुतण्यांची कटरने गळा चिरून हत्या केली. हत्येवेळी ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्याने मोठ्या आवाजात गाणी लावली होती. आरोपीने स्वतःचाही गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
मोठ्या आवाजात गाणी लावून निर्घृण हत्या
आरोपी अमंत पाल शुक्रवारी सकाळी घराबाहेर गेला होता. तो परतला तेव्हा त्याची वहिनी बाथरूममध्ये असल्याने दरवाजा उघडण्यास थोडा उशीर झाला. यामुळे संतापलेल्या अमंतने क्रूरतेची सीमा ओलांडली. मुलांच्या ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून त्याने घरातील स्पीकरचा आवाज पूर्ण वाढवला. त्यानंतर त्याने आपल्या तीन पुतण्यांवर कटर मशीनने एकामागून एक वार करून त्यांचा गळा चिरला. मुलांचे वडील गुड्डू पाल हे रेल्वेच्या पँट्री कारमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात आणि घटनेवेळी ते कामावर होते.
(नक्की वाचा- Central Government on Lockdown: देशात लॉकडाऊनच्या चर्चांदरम्यान केंद्राचं स्पष्टीकरण; सद्यस्थिती काय?)
मृतांची नावे
- अनीश कुमार (10 वर्षे)
- आयुष कुमार (7 वर्षे)
- अनुष्का कुमारी (5 वर्षे)
आरोपीचीही प्रकृती गंभीर
तीन मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी अमंत पाल याने स्वतःचाही गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमंतला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर पटना येथील उच्च केंद्रात हलवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)
पोलीस तपास सुरू
केवळ दरवाजा उघडण्यास उशीर झाला हेच या हत्येचे मुख्य कारण आहे की यामागे काही जुना कौटुंबिक वाद आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपी अद्याप अविवाहित असून त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे सत्य तो शुद्धीवर आल्यानंतरच समोर येईल. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world