

दिल्लीत मॉल बॉम्बने उडवून देण्याची माहिती खोटी, पोलिसांचं स्पष्टीकरण
दिल्लीतील द्वारका सेक्टर 11 मधील सिटी सेंटर मॉलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. दिल्ली पोलीस आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथक, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. संपूर्ण मॉल आधी रिकामा करण्यात आला आहे. आजच द्वारकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र ही अफवा असल्याचं समोर आलं आहे. कुणीतरी चुकीची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तिथे एक आगीची घटना घडली होती. आग आता पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. सध्या कूलिंगचं काम सुरु आहे.
Delhi Police clarifies there is no bomb threat in Dwarka. There was an incident of accidental fire in a shop in Dwarka's mall. pic.twitter.com/y9IPKlAdkK
— ANI (@ANI) May 22, 2024
(नक्की वाचा- Exclusive : 'त्या' निकालातील मोठी चूक पोलिसांनी पकडली, पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट)
याआधीही दिल्लीत शाळा, विमानतळ, गृह मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी देखील पोलिसांना नॉर्थ ब्लॉक येथील इमारतीची तपासणी केली होती. मात्र तिथेही काही मिळालं नाही.
(नक्की वाचा - पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीचा फास आवळणार!)
पोलिसांच्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली-एनसीआर परिसरातील जवळपास 150 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. धमकीचा मेल हंगरीची राजधानी बुडापेस्ट येथील आल्याचा संशय होता. शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके लावण्यात आली आहे. धमकीची बातमी पसरल्यानंतर पालकांचा धावपळ पाहायला मिळाली होती. पालकांनी आपल्या मुलांना घरी नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world