लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 8 नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूरमध्ये ही चकमक झाल्याचं वृत्त आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि हत्यारं जप्त करण्यात आले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्तीसगडमधल्या तीन जिल्ह्यात नक्षवाद विरोधी मोहीम राबवण्यात आली. जवळपास 11 तास हे ऑपेशन झालं. बिजापूर, दंतेवाडा आणि सुकमामध्ये DRG, STF, COBRA आणि CRPF मधील जवळपास 1200 जवान या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी 6 पासून हे एन्काऊन्टर सुरु होतं, अशी माहिती आहे.
( नक्की वाचा : पाकिस्तानचा आदर करायला हवा कारण... मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानं नवा वाद )
सुरक्षा जवानांकडं नक्षलांचे मोहरके तिथं उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनंतर त्यांनी हे ऑपरेळशन सुरु केलं. बस्तरमधील IG, DIG सह तीन जिल्ह्यातील SP ऑपरेशन आणि एन्काऊटरवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती आहे.
एका रिपोर्टनुसार छत्तीसगडमध्ये गेल्या 4 महिन्यात 90 पेक्षा जास्त नक्षलवादी एन्काऊन्टरमध्ये मारले गेले आहेत. तर 123 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलीय. या कालावधीमध्ये 250 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world