जाहिरात
This Article is From May 20, 2024

छत्तीसगडमध्ये पिकअप दरीत कोसळली, 19 जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये पिकअप दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 18 महिलांचा मृत्यू झाला आहे. पिकअपमध्ये जवळपास 25 जण प्रवास करत होते.

छत्तीसगडमध्ये पिकअप दरीत कोसळली, 19 जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये पिकअप दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 19 महिलांचा मृत्यू झाला आहे. पिकअपमध्ये जवळपास 36 जण प्रवास करत होते. सर्वजण तेंदूपत्ता तोडून परतत असताना हा अपघात झाला. कवर्धातील बाहपानी येथे हा अपघात झाला. 
  
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. बचावकार्य सुरु करुन अनेक जखमींना बाहेर काढण्यात आलं आणि जवळी रुग्णालयात दाखल करणात आलं. सर्व मृत बैगा आदिवासी समुदायातील आहेत. आदिवासींच्या या समुदायाला राष्ट्रपतींना दत्तक घेतलं होतं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. आपलं काम उरकून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये 18 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण जखमी असून सर्व जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे, असे पोलिसांना सांगितलं. 

( नक्की वाचा : शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग )

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, "छत्तीसगडमधील रस्ते अपघाताची बातमी अत्यंत दु:खद आहे. या घटनेते मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहे. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते." 

(नक्की वाचा : कल्याण लोकसभा मतदारसंघातील 50 हजार नावं गायब? डोंबिवलीकर मागणार उच्च न्यायालयात दाद )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत म्हटलं की, छत्तीसगडच्या कवर्धा येथील अपघात अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करत आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com