Winter Health Tips: हिवाळा ऋतू सुरू होताच घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू पाहायला मिळतात. यामध्येही घरोघरी सुकामेव्याचे लाडू जास्त प्रमाणात तयार केले जातात. सुकामेव्याचे लाडू चवीला चांगले असतातच शिवाय आरोग्यासाठीही पौष्टिक असतात. सुकामेव्याच्या लाडूद्वारे शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, कॉपर, मॅग्नेशिअम, लोह यासारख्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे शरीराचे कित्येक आजारांपासून सरंक्षण होण्यास मदत मिळेल. सुकामेव्याचे लाडू कसे तयार करायचे? जाणून घेऊया रेसिपी...
सुकामेव्याचे लाडू रेसिपी (How To Make Dry Fruits Laddu At Home)
सामग्री:
- काजू
- बदाम
- पिस्ता
- मनुके
- तूप
- वेलची पूड
- खजूर
(नक्की वाचा: Why You Should Stop Eating Rice: 30 दिवस भात खाल्ला नाही, तर काय होईल?)
सुकामेवा लाडू पाककृती | Dry Fruits Laddu Recipe
- सर्वप्रथम काजू, बदाम, पिस्त्याचे काप करून घ्या आणि खजूरमधील बी काढा.
- सुकामेव्याचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून जाडसर पावडर तयार करा.
- खजूर आणि मनुके वेगळे वाटून घ्या.
- यानंतर एका पॅनमध्ये चमचाभर तूप वितळवून त्यामध्ये सुकामेव्याची पावडर परतून घ्यावी.
- सुकामेवा पावडरचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करावा.
- त्यामध्ये वाटलेले खजूर आणि मनुके मिक्स करा.
- लाडूच्या मिश्रणामध्ये वरुन थोडीशी वेलची पूड मिक्स करा.
- मिश्रणामध्ये ओलावा असेपर्यंत लाडू वळून घ्या.
हिवाळ्यामध्ये सुकामेव्याच्या लाडूचे सेवन केल्यास सर्दी-खोकला दूर होऊन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. तसेच या लाडूचे दुधासोबत सेवन केल्यास वजनही वाढेल. अशक्तपणा जाणवत असेल तर डाएटमध्ये सुकामेव्याच्या लाडूंचा समावेश करावा.
(नक्की वाचा: Weight Gain Causes: झोप येत नाहीय, मूड खराब आणि वजनही वाढतेय; शरीरात हे व्हिटॅमिन झालंय कमी)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

