जाहिरात

पोलीस आणि गावकरी मृतदेह उचलायला गेले अन् हादरले! थरारक घटनेची सर्वत्र चर्चा

Madhya Pradesh News : थरथरत्या आवाजात "साहेब, मी जिवंत आहे" असं म्हटलं. हे दृश्य पाहून पोलीस आणि गावकरी दोघेही अवाक झाले, तर काहीजण घाबरून मागे सरकले.

पोलीस आणि गावकरी मृतदेह उचलायला गेले अन् हादरले! थरारक घटनेची सर्वत्र चर्चा
The strange scene left both villagers and police speechless.
  • A man, presumed dead for nearly 6 hours, suddenly stood up just as villagers were preparing to lift his body
  • Upon questioning, the man revealed he was heavily drunk, lost his balance, and collapsed into the mud
  • The strange case has become the talk of the town, with people dubbing it "The Return of the Dead"
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

MP News: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका थ्रिलर चित्रपटासारखी घटना घडली आहे. सुमारे 6 तास मृत अवस्थेत पडलेला एक माणूस अचानक उठून उभा राहिला. पोलीस आणि गावकरी त्याचा मृतदेह उचलण्याची तयारी करत असतानाच हा विचित्र प्रकार घडला, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले.

ही घटना खुराई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनोरा आणि बनखीरिया गावांच्या दरम्यान घडली. एका माणसाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला चिखलात पालथा पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या व्यक्तीची अनेक तासांपासून काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे तो मृत झाल्याचे गावकऱ्यांनी मानले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: "तो फोन उचलू नका", आत्महत्यापूर्वी फार्मसिस्ट तरुणीसोबत नेमकं काय घडलं?)

Latest and Breaking News on NDTV

माहिती मिळताच पोलीस आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह घेऊन जाण्यासाठी अॅम्बुलन्स बोलावली. तोपर्यंत मोठ्या संख्येने उत्सुक गावकरी तिथे जमले होते आणि पोलीस तपास पूर्ण करत असताना ते सर्वजण पाहत होते. पण पोलीस आणि गावकरी मृतदेह उचलण्यासाठी पुढे सरसावले, तसा 'मृत' व्यक्ती अचानक हालचाल करू लागला आणि उठला. थरथरत्या आवाजात "साहेब, मी जिवंत आहे" असं म्हटलं. हे दृश्य पाहून पोलीस आणि गावकरी दोघेही अवाक झाले, तर काहीजण घाबरून मागे सरकले.

अति नशेत झाल्यामुळे घडला प्रकार

चौकशीनंतर या व्यक्तीने सांगितले की, तो खूप जास्त दारूच्या नशेत होता. रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबला असता, त्याचा तोल गेला आणि तो चिखलात पडला. त्याची नशा इतकी जास्त होती की, तो स्वतः उठू शकला नाही आणि त्याच अवस्थेत अनेक तास पडलेला होता. त्याची मोटारसायकलही जवळच उभी होती.

(नक्की वाचा-  Pune News: ठिकठिकाणी वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण, ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेचा दणदणाट)

या घटनेनंतर गावकऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आयुष्यात अशी घटना कधीच पाहिली नव्हती. आम्हाला वाटले की तो मृतदेह आहे, पण त्याला अचानक उठून बोलताना पाहिल्यावर एखाद्या भूतकथेसारखं वाटलं," असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलिसांनी त्या व्यक्तीला नंतर सुरक्षितपणे घरी पाठवले, पण ही घटना आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com