एअर इंडिया एक्सप्रेसने सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना आज (9 मे) सायंकाळी 4 वाजेपर्यंत कार्यालयात रूजू होण्याचं अल्टिमेटम दिलं आहे. कर्मचारी हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या संकटकाळात एअर इंडियाने मदतीचा हात पुढे केला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या मार्गावरून एअर इंडियाच्या फ्लाइट्स चालविण्यात येणार आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांकडून एक स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संकटकाळात प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कंपनीकडून आज 292 उड्डाणं संचालित करण्यात येतील. त्यांनी पुढे लिहिलं, आम्ही सर्व संसाधने एकत्रित केली आहेत आणि एअर इंडिया आमच्या 20 मार्गांवर फ्लाइट्स देऊन आम्हाला मदत करतील. आमची 74 उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी एअरपोर्टला येण्यासाठी आपल्या उड्डाणांमध्ये काही बदल झाला आहे, याची एकदा चाचपणी करून घ्यावी.
नक्की वाचा - 4 वाजेपर्यंत कामावर हजर व्हा अन्यथा...; एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम
तिकीटाचा परतावा कसा मिळेल?
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठराविक उड्डाणं रद्द झाली किंवा तीन तासांहून अधिक उशिर झाला तर +91 6360012345 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप किंवा airindiaexpress.com या संकेतस्थळावरुन संपर्क करा. यावरुन चॅटबॉट टियावर संपूर्ण परतावा किंवा आपली फ्लाइट मोफत री-शेड्यूल करण्याचा पर्याय निवडू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world