जाहिरात

Ajit Pawar Death: अजितदादांचा घात की अपघात? रोहित पवार अमित शाहांना भेटणार; विमान अपघाताचं रहस्य उघड होणार?

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी राशप आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Death: अजितदादांचा घात की अपघात? रोहित पवार अमित शाहांना भेटणार; विमान अपघाताचं रहस्य उघड होणार?
"Ajit Pawar Death News: रोहित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता"
PTI

- रामराजे शिंदे, प्रतिनिधी

Ajit Pawar Death: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला धक्का बसलाय. या अपघात प्रकरणामध्ये दरदिवशी रोज नवीन खुलासे, शंका तसेच दावे समोर येत आहेत. या घडामोडींदरम्यान राशप आमदार रोहित पवार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी) या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या माहितीस महत्त्व प्राप्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून भेटीची विनंती केली आहे. पण गृहमंत्रालयाकडून अधिकृत वेळ कळवण्यात आली नसली, तरी दुपारी 4 नंतर ही भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीत रोहित पवार विमान कंपनीच्या तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबाबतचे पुरावे शाहांकडे सोपवू शकतात, अशी माहिती आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता दिल्लीतील हालचालींककडे लागले आहे.

(नक्की वाचा: Ajit Pawar News: अजित पवारांच्या संग्रहालयावरुन जय-पार्थमध्ये मतमतांतर, निर्माण झालाय मोठा पेच, नेमका वाद काय?)

अजित पवार यांच्या अपघाताचा नवीन व्हिडीओ | Ajit Pawar Plane Accident New Video

रोहित पवार यांनी उपस्थित केले प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत म्हटलं की, अजित पवार यांच्या विमान अपघातात कटकारस्थानाचा संशय आहे. त्यांनी तज्ज्ञ संस्थांकडून या अपघाताची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांनी या दुर्घटनेत कोणत्याही कटकारस्थानाची शक्यता फेटाळून लावत, हा निव्वळ अपघात असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्या पूर्वीच्या रेकॉर्डबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भूतकाळात मद्यपान करून ड्युटीवर आल्या कारणानं त्यांच्यावर तीन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?) 

पत्रकार परिषदेत रोहित पवार असंही म्हणाले की, सीआयडीकडे या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचा अधिकार नाही. तसेच भारतीय संस्थांबरोबरच नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन अँड अ‍ॅनालिसिस ब्युरो, ब्रिटनची एअर अ‍ॅक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रान्च (एएआयबी) यासारख्या विविध तज्ज्ञ संस्थांकडून व्यापक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेली माहिती वाचण्यासाठी X या चिन्हावर क्लिक करा

Ajit Pawar Death Rohit Pawar Pc.pdf

रोहित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद VIDEO

Listen to the latest songs, only on JioSaavn.com