
India Air Attack on Pakistan : 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरला लक्ष्य केले. लष्करी कारवाईत बहावलपूरसह 9 दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डेही उद्ध्वस्त झाले आहेत. भारताने बहावलपूरच्या मरकझ सुभान अल्लाहला का लक्ष्य केले? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
मरकझ सुभान अल्लाह NH-5 (कराची-तोर्खम महामार्ग) वर बहावलपूरजवळ स्थित आहे. 15 एकर परिसरात पसरलेले असून तरुणांना प्रशिक्षण आणि कट्टरपंथी विचारसरणी देण्याचे प्रमुख केंद्र आहे. हे मरकझ जैशे-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल हेडक्वॉर्टर म्हणून काम करत होते. तसेच 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याशी संबंधित आहे. पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांना याच कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मौलाना मसूद अझहरच्या नातेवाईकांचं वास्तव्य
सुभान अल्लाह मरकझमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचे नातेवाईक आणि संघटनेतील महत्त्वाचे सदस्य जसे की मुफ्ती अब्दुल रौफ असगर आणि मौलाना अम्मार यांचे निवासस्थान देखील होते. मौलाना मसूद अझहर अजूनही जैशे-ए-मोहम्मदचा औपचारिक प्रमुख आहे आणि इस्लामाबाद/रावळपिंडी येथील अज्ञात स्थळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली आहे, तर मुफ्ती संघटनेचे प्रत्यक्ष कामकाज पाहतो.
(नक्की वाचा- Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?)
#OperationSindoor | More information on the terrorist hotbed targeted by the Indian armed forces-
— ANI (@ANI) May 7, 2025
1. Markaz Subhan Allah, Jaish-e-Mohammad Bahawalpur, Punjab, Pakistan- This Markaz serves as the operational headquarter of JeM and associated with terrorist plannings including… pic.twitter.com/EMpWU2txKT
दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र
जैश-ए-मोहम्मद (JeM) मरकझ सुभान अल्लाह येथे आपल्या कार्यकर्त्यांसाठी नियमित शस्त्र, शारीरिक आणि धार्मिक प्रशिक्षण आयोजित करते. मुफ्ती अब्दुल रौफ असगर आणि मौलाना मसूद अझहरचे मेहुणे, युसूफ अझहर उस्ताद घौरी (JeM च्या सशस्त्र शाखेचा प्रमुख) यांसारखे वरिष्ठ JeM अधिकारी याच परिसरात राहत होते. या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांव्यतिरिक्त, या संकुलात 600 हून अधिक जण राहतात. मौलाना रफीकुल्लाह, जो मरकझ उस्मान-ओ-अली येथे माजी धार्मिक प्रशिक्षक होता, तो 2022 च्या मध्यापासून या मरकझमध्ये मुख्य प्रशिक्षक होता.
(नक्की वाचा : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त)
मरकझ सुभान अल्लाहला पाकिस्तानच्या प्रांतीय आणि संघीय सरकारांकडून निधी मिळतो. याशिवाय जेएमने यूकेसह आखाती आणि आफ्रिकन देशांकडूनही निधी उभारला आहे. हे ठिकाण 2015 पासून कार्यरत आहे. मार्च 2018 मध्ये, मरकझच्या आत एक व्यायामशाळा सुरू करण्यात आली होती. जुलै 2018 पासून, JeM दहशतवाद्यांना कठोर शारीरिक आणि खोल पाण्यात डुबकी मारण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक जलतरण तलाव देखील येथे आहे.
मौलाना मसूद अझहरचा अड्डा
अलीकडेच, 30 नोव्हेंबर 2024 रोजी, मौलाना मसूद अझहरने सुमारे दोन वर्षांनंतर मरकझ सुभान अल्लाह येथे JeM कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्याच्या भाषणात बाबरी मशीद विध्वंसाचा बदला घेण्यासारख्या भारतविरोधी वक्तव्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला मौलाना तलहा सैफ (मौलाना मसूद अझहरचा धाकटा भाऊ), मोहम्मद अब्दुल्ला बिन मसूद (मौलाना मसूद अझहरचा मुलगा) आणि इतर JeM ऑपरेटिव्ह उपस्थित होते. यापूर्वी, मौलाना मसूद अझहरने 2022 च्या मध्यात मरकझमधील खतम-ए-बुखारी येथे त्याची उपस्थिती नोंदवली होती. अशारीतीने जैश-ए-मोहम्मद (JeM) बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्लाह येथील मुख्यालयातून आपल्या दहशतवादी कारवाया करत आहे. हे ठिकाण दहशतवादी विचारसरणी आणि प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून काम करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world