जाहिरात

CCTV Footage : भरधाव कार 15 वेळा उलटली, प्रवाशी हवेत उडाले; वडील आणि 2 मुलांचा मृत्यू

Karnataka Accident CCTV footage : अपघातातील मृतांमध्ये 35 वर्षीय मौला अब्दुलचा यांचा समावेश आहे, जे गाडी चालवत होते. त्यांचे दोन्ही मुलगे, रहमान (15 वर्षे) आणि समीर (10 वर्षे) यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

CCTV Footage : भरधाव कार 15 वेळा उलटली, प्रवाशी हवेत उडाले; वडील आणि 2 मुलांचा मृत्यू

कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग- 150 ए वर मंगळवारी एक हृदयद्रावक अपघात घडला. चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोनकलमुरू तालुक्यातील बोम्मक्कनहल्ली मशिदीजवळ हा अपघात झाला.

या अपघातात वडील आणि दोन मुलांना जीव गमवावा लागला. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक कार डिव्हायडरला धडकल्यानंतर 15 वेळा उलटल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान कारमधील लोक हवेत उडताना दिसत आहेत.

(नक्की वाचा-  Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांंचा मृत्यू, 24 जण जखमी)

अपघातातील मृतांमध्ये 35 वर्षीय मौला अब्दुलचा यांचा समावेश आहे, जे गाडी चालवत होते. त्यांचे दोन्ही मुलगे, रहमान (15 वर्षे) आणि समीर (10 वर्षे) यांचाही या अपघातात मृत्यू झाला. अब्दुल यांची पत्नी सलीमा बेगम, आई फातिमा आणि मुलगा हुसेन हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना जवळील  रुग्णालयात दाखल केले आहे. 

(नक्की वाचा-  Dombivli Crime : रीलस्टार सुरेंद्र पाटीलविरोधात लैंगिक अत्याचारात गुन्हा; पुण्याच्या तरुणीसोबत काय घडलं?)

बुलडाण्यात तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू

बुलडाण येथील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना  घडली आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. खाजगी प्रवासी बस, एसटी बस  आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला. बुधवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण  अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, असून 24 जण जखमी  आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: