जाहिरात

Airport Shocking News: 'या' विमानतळाच्या धावपट्टीवर मशिदीचं बांधकाम! प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे, भाजपने..

कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळवरील दुसऱ्या धावपट्टीचं बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

Airport Shocking News:   'या' विमानतळाच्या धावपट्टीवर मशिदीचं बांधकाम! प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे, भाजपने..
Kolkata Airport Runway Mosque News
मुंबई:

Kolkata Airport 2nd Runway Mosque Issue :  कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळवरील दुसऱ्या धावपट्टीचं बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या धावपट्टीच्या बांधकामात एक मशिद अडथळा ठरत आहे.एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर धोका अशल्याचं म्हटलं आहे. कोलकाता विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्ताराचे काम सुरू आहे. ज्यामुळे प्रवाशांची क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. वाढत्या उड्डाणसंख्येच्या पार्श्वभूमीवर दुसरी धावपट्टी तयार करणे अत्यंत गरजेचं आहे.पण मशिद हटवण्याबाबत एएआयला राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान,आता भाजपनेही या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारला घेरले आहे. भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी ममता सरकारवर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. भाजपचे म्हणणे आहे की राज्य सरकारच्या धार्मिक भावना राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रवाशांच्या जीवापेक्षा महत्त्वाच्या ठरत आहेत आणि हे एक बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

नक्की वाचा >> Cidco House News : 'याच' नागरिकांना सिडकोचं घर निवडण्याची आणि बुकिंगची संधी, काय आहे नवा नियम?

भाजप नेते अमित मालवीय यांचा 'ममता सरकार'वर हल्लाबोल

अमित मालवीय यांनी एक्सवर म्हटलंय की, कोलकाता विमानतळाच्या धावपट्टी परिसरात असलेल्या मशि‍दीबद्दल भाजप बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी राज्यसभेत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. आता सरकारने या मशि‍दीमुळे अडथळा निर्माण होत असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, दुसऱ्या धावपट्टीवर असलेली एक मशिद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अडथळा निर्माण करत आहे.  धावपट्टीचा थ्रेशहोल्ड 88 मीटरने सरकला आहे. यामुळे पहिली धावपट्टी उपलब्ध नसताना दुसऱ्या धावपट्टीच्या वापरावर परिणाम होतो.प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राजकारण करू नये. हे ममता बॅनर्जिनी समजून घेतलं पाहिजे. 

नक्की वाचा >> 3 दिवसात 10000000 कमावले! एका फोनमुळं 'या' महिलेचं नशिबच चमकलं, तुम्ही विचारही करू शकत नाही

मशिद कमिटीला हे मान्य नाही

बांधकाम हटवणं मशि‍दीच्या कमिटीला योग्य वाटत नाही. त्यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दर्शवला आहे. मिडिया रिपोर्टनुसरा, मशिद कमिटीचे पदाधिकारी मशि‍दीला विमानतळ परिसराच्या बाहेर किंवा अन्य कोणत्या ठिकाणी शिफ्ट करण्याबाबत सहमती दर्शवत नाहीएत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com