जाहिरात
3 hours ago
मुंबई:

मुंबई, ठाण्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी महाराष्ट्रात मात्र राजकीय पटलावर वादळ घोंगावताना दिसत आहे. (Vidhan Sabha Election) आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना रंगताना दिसत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही प्रकल्पांचे लोकर्पण तर काहींचे उद्घाटन केले. दरम्यान नवनव्या योजनांमुळे शासकीय तिजोरीवर मोठा आर्थिक भार येत आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला दरवर्षी किमान 46 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. 


 

धारावीतील अनधिकृत मशिदी तोडणाचे काम सुरू

धारावीचा सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यास सुरुवात झाली आहे. काल महापालिका अधिकाऱ्यांनी धारावी येथील सुभानिया मशिदीचा अनधिकृत कामाची पाहणी केली. मशिदीचा विश्वस्तांनी 5 दिवसात अनधिकृत भाग पाडायचे लेखी आश्वासन दिले होते. सुभानिया मस्जित विश्वस्तांकडून बांधकाम तोडण्यात येत आहे

दोन दिवसांच्या पावसाने नाशिकमध्ये रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण

दोन दिवसांच्या पावसाने नाशिकमध्ये रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण झाली असून वाहनचालकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले असून यातून वाट काढत वाहनचालकांना प्रवास करावा लागतोय. नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, आडगाव अशा सर्वच परिसरामध्ये रस्त्यांची ही अवस्था बघायला मिळते आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाच प्रश्न वाहनचालकांना पडत असून हे खड्डे बुजवले जाणार तरी कधी ? हा प्रश्न उपस्थित होतोय. 

लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांसमोर प्रचंड गर्दी..

लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांसमोर प्रचंड गर्दी..

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यांमध्ये यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून तासनतास महिलांना बँकांसमोर ताटकळत बसावं लागत आहे. त्याचबरोबर बँकेत पैसे काढायला गेलेल्या महिलांना बँकेचे कर्मचारी ढकलून देत असल्याचा प्रकार देखील घडत आहे.

आबा बागुलही राष्ट्रवादीच्या वाटेवर..

काँग्रेसचे नगरसेवक माजी महापौर आबा बागुल यांनी घेतली पवारांची भेट घेतली आहे. ते पर्वती मतदार संघासाठी इच्छुक असून मतदारसंघाची मागणी केल्याचं समजते. यापूर्वीही आबा बागुल यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पर्वती मतदारसंघात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.  

ऑडिटेड रिटर्न भरण्याची तारीख सात दिवसांनी वाढवली...

ऑडिटेड रिटर्न भरण्याची तारीख सात दिवसांनी वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रामुख्याने छोट्या आणि मध्यम उद्योजकांना कर परतावा भरणे सुकर होणार आहे. आज कर परतावा भरण्याची अखेरची तारीख होती.

वडगाव शेरी विधानसभेची उमेदवारी लवकरच जाहीर होण्याची शक्यता..

वडगाव शेरी विधानसभेची उमेदवारी लवकरच जाहीर होणार?

- वडगाव शेरी विधानसभेची उमेदवारी सुरेंद्र पठारे यांना मिळण्याची शक्यता

- 3 दिवसांपूर्वी शरद पवारांची वडगाव शेरीमध्ये सभा झाली होती

- सुनील टिंगरे यांच्या विरोधात सुरेंद्र टिंगरे महाविकास आघाडीचा चेहरा असण्याची शक्यता

- पुण्यातील अनेक इच्छुक उमेदवार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

यंदा मराठवाड्यात किती झाला पाऊस?

मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्याला हा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी 679.5 मि.मी. आहे. या तुलनेत आजवर 804 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे 125 मि.मी. अधिक पाऊस झाला आहे. मात्र, पुढील काळात आणखी दमदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस

छत्रपती संभाजीनगर : 131 टक्के

जालना : 134 टक्के

बीड : 136 टक्के

हिंगोली : 112 टक्के

परभणी : 108 टक्के

नांदेड : 107 टक्के

लातूर : 111 टक्के

धाराशिव : 120 टक्के

नॅशनल ग्रीन ट्रिब्युलन्सकडून ठाणे महानगरपालिकेला 102 कोटींचा दंड

नॅशनल ग्रीन ट्रिब्युलन्स म्हणजेच एनजीटी या पर्यावरणावर काम करणाऱ्या सरकारी संस्थेने ठाणे महानगरपालिकेला सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता खाडीत सोडल्याप्रकरणी 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.  एसटीपी प्लांट उभे करण्यासंदर्भात वारंवार सांगूनही एनजीटीच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते आरिफ इराकी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तिखट शब्दात टीका

Switch To Dark/Light Mode
Previous Article
गणपतीपुळेच्या समुद्रात 3 जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश
Live Update : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांसमोर प्रचंड गर्दी
shivsena theckeray group mla nitin deshmukh son beaten in akola
Next Article
VIDEO : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाला मारहाण, शिवसैनिक आक्रमक; घटना CCTV मध्ये कैद