
Raj Thackeray on Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात भारतीय लष्कराचं कौतुक होत असताना राज ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली आहे. एरअरस्ट्राईक किंवा युद्ध हे काही दहशतवादी हल्ल्याचं उत्तर असू शकत नाही, असं परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाम हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकवला पाहिजे, असे मी म्हटले होते. मात्र दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध असू शकत नाही. युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रील आणि सायरन वाजवायचे. मुळात हे का घडलं? याचा विचार करणे गरजेचे आहे. इतके पर्यटक असताना तिथे सुरक्षा का नव्हती हे महत्त्वाचे आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
(नक्की वाचा- Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त)
पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला अजून काय बरबाद करणार तुम्ही? हल्ला करणारे अतिरेकी तुम्हाला सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे वर्षानुवर्षे जात आहे तिथे सुरक्षा का नव्हती हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या देशात कोंबिग ऑपरेशन करून यांना हुडकून काढणे गरजेचे आहे. एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूर नाव देता हे महत्त्वाचे नाही. नावाने कुणी भावनिक होत नाही. तुम्ही काय पाऊले उचलता ते महत्त्वाचे आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
(नक्की वाचा- Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?)
सरकारच्या चुका तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत. मॉक ड्रील, एअर स्ट्राईक करणे हे काही या गोष्टीवर उत्तर नाही. अतिरेक्यांना शोधून काढत त्यांचा बंदोबस्त करणे आणि देशभर मॉक ड्रील करण्यापेक्षा कोंबिग ऑपरेशन केले पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world