नवी दिल्ली
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसमान्यांना घाम फुटला आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी आता मोबाइलवर बोलणं, डेटा वापरणं महाग होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांनी 5जी साठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून सेवेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांवर याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे मोबाईल सेवेसाठी आता अधिक पेसै मोजावे लागणार आहेत. मोबाईल सेवा १५ ते १७ टक्क्यांनी महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीनंतर फोन बिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
बारामती कोल्हापूरसह 11 मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
अॅटिक स्टॉक ब्रोकिंगने मोबाईल सेवादरात वाढ होण्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी आहे. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये मोबाईल सेवादरात २० टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे प्रतिवापरकर्ता महसुली उत्पन्नात वाढ होईल. त्याचा सर्वाधिक फायदा एअरटेलला होणार आहे. सध्या एअरटेल कंपनीचे प्रतिवापरकर्ता उत्पन्न सर्वाधिक 208 रुपये आहे. कंपनीने 2027 पर्यंत त्यात 286 रुपयांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
'आणखी एका जागतिक वावटळीसाठी तयार व्हा' उदय कोटक थेट बोलले
ग्राहकांच्या बिलामध्ये ५५ रुपयांची वाढ होईल. सेवेनुसार त्यात कमी व जास्त असा फरक होईल. याशिवाय 2-जी सेवेमधून 4-जी मध्ये रुपांतर करण्यासाठी १० रुपये, तर जास्तीचा डेटा प्लान खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पोस्टपेड सेवेसाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. टेलिकॉम कंपन्यांनी 5 स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी आणि 5-जी सेवेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यामुळे प्रतिवापरकर्ता महसूल वाढविण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. टेलिकॉम कंपन्यांना परवाना शुल्क भरण्यासाठी महसूल वाढवावा लागणार आहे. अशा स्थितीत टेलिकॉम कंपन्यांना मोबाईलचे दर वाढवावे लागणार आहेत.
बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा
पेट्रोल आणि डिझेलच्या दराबद्दल कशी मिळवाल माहिती?
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर आरएसपी आणि त्यांचा शहर कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात. बीपी सीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी आणि त्यांचा शहर कोड लिहून एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.